शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूची विदर्भात दहशत

By admin | Updated: February 3, 2015 01:04 IST

‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३४ रुग्ण स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह आले असून ११ जणांचा बळी गेला आहे, तर अमरावती जिल्ह्यात दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

एकाच महिन्यात ११ जणांचा बळी: अमरावतीत दोन रुग्णअमरावती/नागपूर : ‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३४ रुग्ण स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह आले असून ११ जणांचा बळी गेला आहे, तर अमरावती जिल्ह्यात दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत.सोमवारी मेडिकल रुग्णालयातून दोन संशयितांचे नमुने मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सायंकाळी आलेल्या अहवालात त्यापैकी एकाला ‘स्वाईन फ्लू’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ‘स्वाईन फ्लू’बाधित १६ वर्षीय तरुण हिंगणघाटचा आहे. सध्या मेडिकल रुग्णालयात सहा रुग्ण उपचार घेत असून एकाची प्रकृती गंभीर आहे.अमरावतीत दोन संशयित रुग्णअमरावती शहरात ‘स्वाईन फ्लू’ या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. इर्विन रुग्णालयातील ‘स्वाईन फ्लू’च्या वॉर्डात २०० टॅमी फ्लू गोळ्यांचा साठा पुरविण्यात आला. नांदगाव पेठ येथील एका संशयित रुग्णाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची चर्चा असून शहरातीलच डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये २७ जानेवारी रोजी ३० वर्षे वयोगटातील संशयित रुग्ण दाखल करण्यात आला आहे. या रुग्णावर तेथील डॉक्टरांनी टॅमी फ्लूचे उपचार सुरू केले आहेत. इतकेच नव्हे, तर या रूग्णाने जिल्हा सामान्य रूग्णालयात ‘थ्रोट स्वॅप’च्या तपासणीसाठी हजेरी लावली. त्याने जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘स्वाईन फ्लू’ वॉर्डात टॅमी फ्लूच्या गोळ्यांची मागणी केली आहे. स्वाईन फ्लूचा दुसरा संशयित रुग्ण ५५ वर्षांचा असून तो कॉटन मार्केट परिसरातील रहिवासी असल्याची माहिती इर्विनच्या सूत्रांकडून मिळाली. त्याचा एक नातेवाईक नागपूर येथील रुग्णालयात य्उपचार घेत आहे. (प्रतिनिधी)