शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला!

By admin | Updated: June 10, 2015 00:34 IST

कार्यालयाची तोडफोड : कर्मचारी पळाले; थकित बिले देण्याची मागणी

सांगली : उसाचे थकीत बिल द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर हल्ला चढविला. लेखा विभाग, साखर, रोखपाल, तोडणी व संगणक विभागातील खिडक्यांच्या, केबिनच्या तसेच टेबलच्या काचा फोडल्या. दोन संगणकही फोडले. खुर्च्या, टेबल भिरकावले. या प्रकारामुळे भीतीने कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन करून दुसऱ्या विभागात आश्रय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर कारखाना तसेच कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.साखर कारखान्याचा तीन महिन्यांपूर्वी गळीत हंगाम संपला आहे. वसंतदादा कारखान्याची २०१३ ची १५ कोटींची, तर २०१४ ची ३१ कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. बिले द्यावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता वसंतदादा कारखान्यावर धडक मारली. कारखान्याच्या मुख्य गेटमधून थेट लेखा विभागाजवळ ते गेले. या विभागातच ऊस तोडणी, संगणक, रोखपाल व साखर विभाग आहे. तिथे प्रवेश करण्यापूर्वी बाहेर असलेल्या खिडकीवर कार्यकर्त्यांनी लाथा मारून काचा फोडल्या. तिथे सभासदांच्या माहितीसाठी लावलेला सूचना फलक काढून टाकला. अध्यक्षासह २३ जणांविरुद्ध गुन्हाकारखान्यातील रखवालदार पांडुरंग राजू बंडगर यांनी सायंकाळी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार स्वाभिमानीचे मिरज तालुका अध्यक्ष महावीर पाटील (रा. नांद्रे, ता. मिरज) यांच्यासह २० ते २३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केबिन, टेबल व खिडक्यांच्या काचा फोडून ४० ते ५० हजारांचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.नाकाबंदी... बंदोबस्त तैनातहल्ला झाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. तोपर्यंत कार्यकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी हल्ल्याची सर्व माहिती कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर शहर व परिसरात नाकाबंदी केली होती. शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक : राजू शेट्टीखासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी दिल्लीत आहे. वसंतदादा कारखान्यावर हल्ला झाल्याचे मला समजले आहे. कारखान्याचे प्रशासन दोन-दोन वर्षे शेतकऱ्यांच्या उसाचे बिले देत नसेल, तर आणखी काय होणार? बिले कधी देणार, यासाठी फोन केला, तर फोन उचलत नाहीत. शेतकऱ्यांनी काही बिया किंवा खतांची चोरी केलेली नाही. त्यांनी कष्टाने उसाचे पीक उभे करुन तुमच्या कारखान्याला ऊस घातला. मग त्याची बिले वेळेत द्यायला नको का? हा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक आहे. जिल्ह्यातून अन्य कारखान्यांनी यातून काय समजून घ्यायचे ते घ्यावे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही तोडफोड केल्याचे वाटत नाही. संघटना कधीच अशी कृती केल्याचे दिसले नाही. राजकीय पूर्ववैमनस्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. वसंतदादा कारखाना बंद पडल्याशिवाय ज्यांची राजकीय पोळी भाजली जाणार नाही, अशा नेत्यांचेच हे कृत्य असावे. - विशाल पाटील, अध्यक्ष वसंतदादा साखर कारखाना,सांगली