शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

"काहींची इच्छा नसली तरी सुनेत्रा काकींनीच अध्यक्ष व्हावे"; रोहित पवारांचे विधान; NCP च्या नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:32 IST

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्विकारल्यानंतर रोहित पवार यांनी पोस्ट करत अध्यक्षपदाचा मुद्दा छेडला आहे.

Rohit Pawar on Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक पर्वाची आज मंत्रालयात सुरुवात झाली. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या पदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली. मात्र, या पदभार स्वीकारण्याच्या सोहळ्यापेक्षा रोहित पवार यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

मंत्रालयात भावूक वातावरण; पार्थ पवारांना अश्रू अनावर

३१ जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज विधीवत कामकाजाला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि आदिती तटकरे उपस्थित होते. ज्या खुर्चीत अजितदादा बसत असत, तिथे आज सुनेत्रा पवार यांना पाहताना पार्थ पवार आणि आदिती तटकरे यांना अश्रू अनावर झाले. 

रोहित पवारांची पोस्ट आणि अध्यक्षपदाची गुगली

एककीडे सुनेत्रा पवार पदभार स्वीकारत असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रोहित पवार म्हणाले, "ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज मा. सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे. अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!"

परंतु, रोहित पवारांनी आपल्या पोस्टच्या शेवटी एक महत्त्वाचे विधान केले. "काकींनी आउपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं. रोहित पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे.

राष्ट्रीय अध्यक्षपदाचा नेमका वाद काय?

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पक्षात दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनेत्रा पवार यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी, जेणेकरून अजितदादांचा वारसा आणि सहानुभूती पक्षाच्या पाठीशी राहील, असे एका गटाचे मत आहे. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे अध्यक्षपद सोपवावे, अशी काही ज्येष्ठ नेत्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे.

सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा सुनेत्रा पवारांचा संकल्प

पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "दादांनी आयुष्यभर महाराष्ट्रासाठी जो ध्यास घेतला, तोच माझा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा मी सक्षमपणे पुढे नेईन. शेतकरी, महिला आणि तरुणांच्या अपेक्षांना न्याय देणे हीच माझी प्राथमिकता असेल."

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar Should Be NCP Chief Despite Some Opposition: Rohit Pawar

Web Summary : Sunetra Pawar assumed office as Deputy CM, stirring NCP leadership discussions. Rohit Pawar suggests she should also be party president, sparking debate amid divided opinions on succession after Ajit Pawar's term.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेल