राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 18:02 IST2026-02-26T17:32:50+5:302026-02-26T18:02:13+5:30

Sunetra Pawar: अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निव़़ड करण्यात आली आहे.

Sunetra Pawar, Praful Patel announced as National Presidents of NCP (Ajit Pawar) | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा 

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निव़़ड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पुन्हा घेईल, असा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं होतं. अजित पवार यांच्या निधनानंतर उदभवलेल्या कठीण परिस्थिती सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काय होणार, विलिनीकरणाची प्रक्रिया कशी राबवली जाणार याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात होते. अखेरीस आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा निर्णय़ जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. 

याआधी राजकारणात फारशा सहभागी नसलेल्या सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादांसोबत सक्रीय राजकारणात उतरल्या होत्या. त्यांना २०२४ साली बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर काही काळाने पक्षाने त्यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड केली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच आता त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.  

Web Title : सुनेत्रा पवार बनीं राकांपा (अजित पवार) की राष्ट्रीय अध्यक्ष

Web Summary : अजित पवार के निधन के बाद, उनकी पत्नी सुनेत्रा पवार अब राकांपा की राष्ट्रीय अध्यक्ष हैं। वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल ने पार्टी बैठक में उनकी नियुक्ति की घोषणा की, और पार्टी के पुनर्निर्माण के लिए उनके नेतृत्व पर विश्वास व्यक्त किया।

Web Title : Sunetra Pawar Appointed National President of NCP (Ajit Pawar Faction)

Web Summary : Following Ajit Pawar's death, his wife Sunetra Pawar is now NCP's national president. Senior leader Prafull Patel announced her appointment at a party meeting, expressing confidence in her leadership to rebuild the party.