शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘समर स्पेशल’ धमाका!

By admin | Updated: March 20, 2015 01:56 IST

उन्हाळी सुटीनिमित्त (समर स्पेशल) मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने तीच संधी साधत भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेनचा धमाकाच लावला आहे.

प्रवाशांसाठी खूशखबर : आतापर्यंत मध्य रेल्वेकडून ३२२ ट्रेनची घोषणामुंबई : उन्हाळी सुटीनिमित्त (समर स्पेशल) मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने तीच संधी साधत भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेनचा धमाकाच लावला आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेकडून ३२२ उन्हाळी विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. काही शाळा आणि कॉलेजला सुटी लागताच एप्रिल ते मे या तीन महिन्यांत अनेक जण आपल्या कुटुंबीयांसह गावी जातात किंवा अन्य पर्यटनस्थळ गाठतात. या तीन महिन्यांत मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या पाहता मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ३२२ उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या असून, ९७ प्रिमियम आणि २२५ नॉन प्रिमियम ट्रेन आहेत. मागणीनुसार तिकिटांची किंमत प्रिमियममध्ये वाढत असल्याने गर्दीच्या वेळेत या ९७ ट्रेन सोडण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, धुळे, नागपूर, भुसावळ, सोलापूर, करमाळी, मडगावसाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे; तर महाराष्ट्राबाहेरील लखनौ, वाराणसी, एर्नाकुलम, तिरुनेलवेल्लीसाठीच्या ट्रेनचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही, असे मत मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले. 156 ट्रेनमध्ये मुंबई-नागपूर प्रिमियम सुपरफास्टच्या २६, एलटीटी-गोरखपूर प्रिमियम विशेष २६, एलटीटी-वाराणसी प्रिमियम विशेष २४, एलटीटी-करमाळी एसी सुपरफास्ट विशेष २२, एलटीटी-लखनौ एसी सुपरफास्ट विशेष ४, दादर-भुसावळ सुपरफास्ट विशेष २८, सोलापूर-नागपूर विशेष २६ ट्रेन सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. 27मार्चपासून या ट्रेन सुरू होणार असून, जूनच्या अखेरपर्यंत त्या धावतील. यातील सोलापूर ते नागपूर, दादर ते भुसावळ, एलटीटी-लखनौ आणि एलटीटी-करमाळी ट्रेनचे आरक्षण २१ मार्चपासून सुरू होत आहे. कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन : कोकण रेल्वेकडून मडगाव ते सीएसटीसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 00११२ ट्रेन मडगावहून २२ मार्च रोजी १६.00 वाजता सुटून सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी ६.१५ वाजता पोहोचेल. तर 00१११ ट्रेन २३ मार्च रोजी सीएसटीहून ११.0५ वाजता सुटून मडगावला २३.३0 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे २१ मार्च रोजी सीएसटी ते करमाळी ट्रेन सोडण्यात येत असून, 0१00१ ट्रेन सीएसटीहून 00.३0 वाजता सुटून करमाळी येथे १२.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१00२ करमाळी येथून १६ वाजता सुटून सीएसटी येथे ६.१५ वाजता पोहोचेल.