शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर ‘सुकन्या’चा विमा रखडला

By admin | Updated: July 27, 2014 01:20 IST

मुलींचा जन्मदर वाढविण्याबरोबरच त्यांच्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी शासनाने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेंतर्गत १ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेल्या बीपीएल कुटुंबातील मुलींचा

एक वर्ष वयापर्यंतच काढावा लागतो विमा : सात महिने लोटूनही योजनेची अंमलबजावणी नाहीदिगांबर जवादे - गडचिरोलीमुलींचा जन्मदर वाढविण्याबरोबरच त्यांच्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी शासनाने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेंतर्गत १ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेल्या बीपीएल कुटुंबातील मुलींचा विमा काढून १८ वर्षांनंतर त्या मुलीच्या नावे १ लाख रूपये जमा होतात. मात्र ७ महिने लोटूनही शासनाने अद्याप राज्यातील एकाही मुलीचा विमा काढला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशासह महाराष्ट्रही आर्थिक विकासाच्या रथावर स्वार असला तरी महिला व मुलींना अजुनही समान दर्जा मिळाला नसल्याचे हे विदारक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रयत्न चालविले आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुकन्या योजना सुरू करण्यात आली. योजनेंतर्गत १ जानेवारी २०१४ नंतर बीपीएल कुटुंबात जन्मलेल्या दोन मुलींचा आयुर्विमा महामंडळाकडे २१ हजार २०० रूपये भरून विमा काढला जाणे अपेक्षित होते. १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या नावे १ लाख रूपये जमा होऊन ही रक्कम मुलीला दिली जाणार होती. त्याचबरोबर मुलीच्या पालकाचाही विमा काढला काढून त्यांचे निधन झाल्यास विम्याची रक्कम मुलीला मिळणार होती. योजनेच्या अटीनुसार मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत विमा काढणे आवश्यक आहे. मात्र १ जानेवारी रोजी जन्मलेल्या मुली आता ७ महिन्याच्या झाल्या तरी शासनाने राज्यभरातील अद्याप एकाही मुलीचा विमा काढला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ आपल्या मुलीला मिळणार की नाही अशी चिंता पालक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे हा विमा महिला व बालविकास विभागाच्या विभागीय कार्यालयातर्फे काढण्यात येणार आहे की, प्रकल्पस्तरावर काढण्यात येणार आहे. हे सुध्दा शासकीय अधिकाऱ्यांनाच अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रामीण भागातून प्राप्त झालेले अर्ज छाननी करून स्वत:जवळ ठेवणे एवढेच काम सद्य:स्थितीत केले जात आहे.