शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक फौजदाराची पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्त्या

By admin | Updated: October 14, 2014 14:55 IST

दोन हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अंभी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक फौजदाराने गळफास घेवून आत्महत्त्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद, दि. १४ - दोन हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अंभी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार एस.ए.काझी यांनी उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांच्या टॉलेटमध्ये सोमवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्त्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अवैध दारू विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी एका तक्रारदाराकडून दोन हजार रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करेप्शन ब्युरोच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या सहका-यांनी सोमवारी दुपारी काझी यांना अटक केली होती.त्यानंतर काझी यांची अंभीमध्ये चौकशी करून उस्मानाबादमध्ये आणण्यात आले होते आणि शहर पोलीस स्टेशनच्या पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजून ३० मिनीटाच्या सुमारास काझी यांना शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले होते.त्यानंतर काझी हे सव्वा तीनच्या सुमारास पोलीस कर्मचा-यांच्या टॉलेटमध्ये लघवी करण्याच्या निमित्ताने गेले आणि खिडकीच्या गजाला गमज्या अडकावून गळफास आत्महत्त्या केली.त्यानंतर काही वेळाने हा आत्महत्त्येचा हा प्रकार लक्षात आला आणि शहर पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली. यावेळी सुरक्षा गार्ड कोण होता,स्टेशन डायरीवर कोणाची नेमणूक होती, पोलीस निरीक्षक कोठे होते, याबाबत आता चौकशी होईल. यात दोषी कोण याचीही चौकशी होईल पण काझी यांनी लाच मागितली नव्हती, त्यांना बळजबरीने बळीचा बकरा बनविण्यात आले असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
मयत सहाय्यक फौजदार काझी हे उस्मानाबाद येथील समतानगरमधील रहिवासी आहेत. ते अंभी येथे ड्युटीला होते. त्यांना तीन मुले असून, एक मुलगा हैद्राबादला असतो. घरातील तिघेजण पोलीस खात्यातच ड्युटीला असून, एक भाऊ न्यायाधीश असल्याचे सांगण्यात आले. सर्व कुटुंब प्रतिष्ठित असल्यामुळे काझी यांना पश्चाताप झाला असावा आणि त्यातून त्यांनी आत्महत्त्या केली असावी,असा काही जणांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस हे प्रकरण कशाप्रकारे हाताळतात याकडे लक्ष आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त पांगला असून त्यात या घटनेमुळे पोलीसांची कसोटी लागली आहे.