शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वेळ आल्यावर ब्लू प्रिंट सादर करु - राज ठाकरे

By admin | Updated: August 17, 2014 16:31 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन. त्यावर सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास ठेऊ नका असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. १७ -   सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. हल्ली प्रसारमाध्यम वॉट्स अ‍ॅपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.
ठाण्यात मिक्ता २०१४ या नाट्य आणि चित्रपट महोत्सवाचे रविवारी राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी राज ठाकरेंनी मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी भाष्य केले. मनसेची ब्लू प्रिंट कधी येणार याची सध्या प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ब्लू प्रिंटच्या प्रकाशनाला रतन टाटा, मुकेश अंबानी येतील हे मलादेखील माहित नव्हते असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला . आमची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेनच असे त्यांनी नमूद केले. नरेंद्र मोदींवर सोशल मीडियावर टीका सुरु झाल्याच्या माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी भलताच अर्थ काढला असा आरोपही त्यांनी केला. सोशल मीडिया हे माध्यमप्रभावी असले तरी ते आता डोकेदुखी ठरु लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी सोशल मीडियापासून थोडं लांब राहायला हवे असे त्यांनी सांगितले. 
गेल्या पाच वर्षांपासून मनसेची राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडू असे राज ठाकरे सांगत आहेत. मात्र अद्याप ही ब्लू प्रिंट प्रकाशित करण्यात आली नसून यावरुन राज ठाकरेंवर वारंवार टीका होत आली आहे.