शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लांबले, आरक्षण निश्चित करण्यासाठीच्या समितीला हवी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:12 IST

अनुसूचित जातींना १३ टक्के आरक्षण आहे.

मुंबई : अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून मागासलेपणाच्या आधारे त्यांच्या जातींसाठीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या न्या. अनंत बदर समितीने अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आठ महिन्यांची मुदतवाढ मागितल्याने उपवर्गीकरण लगेच लागू होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण संदर्भात निर्णय दिल्यानंतर महायुती सरकारने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय राज्यात लागू करण्यासंदर्भात समिती नेमली होती आणि तीन महिन्यांत अहवाल देण्यास सांगितले होते. समितीची मुदत १५ जानेवारीला संपली. 

या मुदतीत समितीने अहवाल सादर केला नाही . केवळ अंतरिम अहवाल सादर केला आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत मागितली आहे. 

१३ टक्के आरक्षणाचे वाटपअनुसूचित जातींना १३ टक्के आरक्षण आहे. या प्रवर्गातील विविध जातींच्या मागासलेपणाचा अभ्यास करून त्या आधारे या १३ टक्के आरक्षणाचे वाटप करणे हा उपवर्गीकरणाचा मुख्य हेतू आहे.महायुती सरकारने  पाच राज्यांत जाऊन या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल बदर समितीने घेतला आहे. या अहवालाचा उपयोग बदर समितीला होईल. 

महायुतीला झाला होता फायदाउपवर्गीकरणासाठी राज्य सरकारने समिती नेमल्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचा निर्णय देताना राज्य सरकारांनी त्याचे स्वरुप निश्चित  करावे, असे म्हटले होते. राज्य सरकारने मुदतवाढीची मागणी मान्य केली तर सप्टेंबर २०२५ पर्यंत तरी उपवर्गीकरण राज्यात लागू होणार नाही. 

उपवर्गीकरणासाठी महायुती सरकारने समिती नेमली हा अनुसूचित जातींमधील अनेक घटकांना मोठा दिलासा होता. आता अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. वेळ वाया जाऊ नये.- कॉ. गणपत भिसे, उपवर्गीकरण आंदोलनातील कार्यकर्ते

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण संपवण्याचा डाव आहे. म्हणून आमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. सध्याचे १३ टक्के आरक्षण सर्व जातींसाठी आहे. विशिष्ट जातीलाच ते मिळते असे म्हणणे अन्यायकारक आहे.- नितीन राऊत माजी मंत्री

टॅग्स :reservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय