शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचा प्रचारी झंझावात

By admin | Updated: October 11, 2014 05:44 IST

नागपूरच्या धंतोलीमधील मेहडिया चौकात भाजपाचे कार्यकर्ते जय्यत तयारीत होते... तेवढ्यात ‘देवेंद्रभाऊ आले’ असे कुणीतरी उच्चरवात बोलले

संदीप प्रधान, मुंबईनागपूरच्या धंतोलीमधील मेहडिया चौकात भाजपाचे कार्यकर्ते जय्यत तयारीत होते... तेवढ्यात ‘देवेंद्रभाऊ आले’ असे कुणीतरी उच्चरवात बोलले... लागलीच पांगलेल्या कार्यकर्त्यांचे पदयात्रेत रुपांतर झाले... फडणवीसांची पदयात्रा धंतोली तकीया या बैठ्या घरांच्या चिंचोळ््या वस्तीत शिरताच ताशाच्या कडकडाटाने कुत्री भुंकू लागली, देवेंद्र यांचे ‘मास्क’ चढवलेली गुडघ्याएवढी पोरं सैरावैरा पळू लागली, घराघरातून बाया पंचारती घेऊन बाहेर पडू लागल्या, हाततुरे देऊन देवेंद्र यांचे स्वागत होऊ लागले आणि एकच घोषणा घुमली ‘महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो...’फडणवीस ठिकठिकाणी थांबून त्यांच्या स्वागताचा स्वीकार करीत होते. घाटरोड, रामबाग असा कधी पायी तर कधी उघड्या जीपवरून त्यांनी प्रवास केला. गॅलरीतील परिचिताला हात दाखव, गर्दीतून पुढे आलेल्यांच्या हस्तांदोलनाचा स्वीकार कर असे करीत अखेरीस पदयात्रा संपवून फडणवीस मोटारीत बसले तेव्हा त्यांच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेला होता. त्यांनी हलकेच तो पुसला. दररोज कपाळावर मळवट भरल्याने आणि अक्षता दाबून लावल्याने जखम झाली आहे, फडणवीस सांगत होते.फडणवीसांच्या सहा आसनी विमानाने पुण्याच्या दिशेने प्रयाण केले. रोज पहाटे पाच वाजता झोपतो आणि आठ वाजता उठून प्रचार सुरू करतो. मतदारसंघात दोन तास पदयात्रा केल्यावर राज्याच्या वेगवेगळ््या भागात प्रचार दौरा सुरू होतो. तेवढ्यात पॅकबंद नाश्ता फडणवीसांसमोर आला. प्रचारादरम्यान आहाराची काही पथ्य पाळता का? या प्रश्नावर मोठा घास घेत ‘मिळेल ते खातो,’ असे ते म्हणाले. प्रचारादरम्यान तब्येत राखण्याकरिता काही औषधे घेता का?, असे विचारताच, ‘मी तब्येतीला सांगितले आहे की १५ आॅक्टोबरपर्यंत तू मला साथ दे नंतर मी तुझी काळजी घेईन,’ हे सांगताना फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील प्रचाराचा शिणवटा ठळकपणे दिसत होता. राजकीय वजन वाढलंय. मघाशी तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणा झाल्या... स्वत:ला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मानत नाही. लोकांचा उत्साह कंट्रोल करावा लागतो, असे ते बोलले. गाणी ऐकण्याचा मला शौक आहे. सध्या त्याकरिता वेळ मिळत नाही. बरीच गाणी पाठ आहेत ती मधेमधे गुणगुणतो, असे ते बोलले.एरव्ही दररोज सर्व पेपर वाचत होतो. आता फक्त अपडेट घेतो, असे ते म्हणाले.प्रचारात मोदींनी रंगीत कुर्ते परिधान करून नवा ट्रेन्ड आणला. तुमचा चॉईस काय?काळ््या रंगाच्या पॅन्टवर डार्क शर्ट असेल तर फिकट रंगाचे जाकिट घालतो. आपले कपडे नागपूरच्या गोविंद टेलरकडे गेली २० वर्षे शिवत आलोय, असे त्यांनी सांगितले. पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी सफेद शर्ट बदलून त्यावर निळ््या रंगाचे जाकीट परिधान केले.