शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जलचळवळ उभारा; जलक्रांती होईल!

By admin | Updated: September 19, 2015 21:42 IST

पाण्याबाबतच्या कोणत्याही योजनेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलीच पाहिजे, असा नियम आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर पाण्याची उपलब्धता,

- डॉ. राजेंद्र सिंह (जलपुरुष)

पाण्याबाबतच्या कोणत्याही योजनेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलीच पाहिजे, असा नियम आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर पाण्याची उपलब्धता, पाण्याची साठवण आणि भूगर्भातील जलसाठा वाढविण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखणे गरजेचे असून, त्यासाठी महाराष्ट्रात अधिक जोमाने जलचळवळ उभारणे आवश्यक आहे; आणि असे झाले तर महाराष्ट्रात नक्कीच जलक्रांती होण्यास मदत होईल.देश असो किंवा महाराष्ट्र असो. गेल्या कित्येक वर्षांपासून दुष्काळाचा प्रश्न कायम आहे. केवळ दुष्काळाचे स्वरूप बदलते. महाराष्ट्रातल्या दुष्काळाला कित्येक समस्या कारणीभूत आहेत; आणि यापूर्वी मी अनेकवेळा राज्यातील दुष्काळाबाबत विवेचन केले आहे. दुष्काळावर मात कशी करायची याबाबतही सांगितले आहे. साधी, सोपी आणि सरळ गोष्ट, ती म्हणजे पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा. पाऊसच होत नसेल तर पाणी अडवणार कसे? असे कोणी म्हणत असेल तर मी असे म्हणेन की, प्रत्येक वर्षी होणाऱ्या पावसाचे पाणी साठविणे गरजेचे आहे. राज्यातील बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे पाण्याची साठवण आणि पाण्याचे वाटप या दोन्हीबाबत ग्रामीण भागाचा विचार प्राधान्याने गरजेचा आहे. भविष्यातील जलनियोजनासाठी जिल्हा, तालुका स्तरावर पाण्याबाबत उपाययोजना कराव्या लागतील. पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे पाणी आणि उद्योगांसाठीचे पाणी असा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. पाण्याच्या पुनर्वापराचे धोरण स्वीकारावे लागेल. गावागावांत पाणलोट क्षेत्र विकासाचे काम हाती घ्यावे लागेल. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा कार्यक्रम प्राधान्याने राबविला गेला पाहिजे. शिवाय आता जो काही पाऊस पडेल त्या पावसाचे पाणी अडवावे लागेल. ते साठवावे लागेल; शिवाय त्याच पाण्याला झिरपू द्यावे लागेल. यासाठी एक चळवळ उभी करावी लागेल. राज्यात लोकांना लोकांसाठीच जलक्रांती हाती घ्यावी लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहू नये. लोकांनी लोकांसाठी पुढाकार घेतला तर पाण्याचे नियोजन सहज होईल. फक्त त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. जलनियोजनासाठी जलसाक्षरता घ्यावी लागेल.