शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 12:02 PM

राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्दे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत इयत्ता पाचवीच्या निकालात सुमारे एक ते दोन टक्क्यांनी घट झाली आहे. पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल २२.०४ टक्के, तर आठवी शिष्यवृत्तीचा निकाल १८.४९ टक्के लागला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेल्या ८ लाख ६६ हजार १३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७२ हजार ४६६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार ३९४ आहे, असे परीक्षा परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. परिषदेतर्फे १६ मे रोजी परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला होता. तसेच १६ ते २५ मे या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांवर आवश्यक कार्यवाही केल्यानंतर बुधवारी (दि. १९)शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पूर्वी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे.पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा आपल्या शाळेचा सर्वाधिक निकाल लागावा यासाठी जिल्हा परिषदेच्या  शिक्षकांमध्ये स्पर्धा होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. त्यातच प्राथमिक शिक्षणाची रचना बदलण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावर झाला आहे. ............विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनच्शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विद्यार्थी तेच आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी दुसरे विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यावर भर द्यावा. तरच शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात वाढ होईल, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाºयांनी सांगितले..................परीक्षेचे नाव         नोंदवलेले        पात्र             शिष्यवृत्तीधारक     निकालाची                             विद्यार्थी        विद्यार्थी       विद्यार्थी               टक्केवारीइयत्ता पाचवी      ५,१२,७६३       १,०९,२३०       १६,५७९                २२.०४इयत्ता आठवी     ३,५३,३६८       ६३,२३६         १४,८१५                  १८.४९एकूण                    ८,६६,१३१    १,७२,४६६        ३१,३९४                २०.५९    

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाexamपरीक्षाEducationशिक्षणonlineऑनलाइन