शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित; दरडोई उत्पन्नात राज्य देशात पाचव्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:30 IST

आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे. 

कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणांमुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार २०२५-२६ मध्ये राज्याचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ५१,००,५९७ कोटी रुपये इतके अपेक्षित आहे, तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न २८,८२,६९९ कोटी रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे.

देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटापहिल्या सुधारित अंदाजानुसार २०२४-२५ मध्ये देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४% असून तो देशातील सर्वाधिक आहे. राज्यात रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री आज मांडणार बजेट मुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (दि. ६) राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडतील. यात आर्थिक शिस्त दिसेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. 

दरडोई उत्पन्न किती?

राज्याचे दरडोई उत्पन्न २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३,४७,९०३ रुपये इतके अपेक्षित आहे. 

उद्योग, गुंतवणुकीत आघाडी राज्यात डिसेंबर २०२५ पर्यंत ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली असून त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगारांची निर्मिती झाली आहे.

देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१% वाट्यासह महाराष्ट्र अग्रस्थानी.स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७% हिस्सा. ऊर्जा निर्मितीत राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

राज्यावरील कर्ज ९.३२ लाख कोटींवर

राज्याचे एकूण कर्ज २०२५-२६ या अर्थसंकल्पीय वर्षात ११.१ टक्क्यांनी वाढून ९ लाख ३२ हजार २४२ कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज असल्याचे २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Economy Projected to Grow 7.9%; Per Capita Income High

Web Summary : Maharashtra's economy is expected to grow by 7.9% in the current fiscal year. The state's strong performance is driven by growth in agriculture, industry, and services, coupled with infrastructure investments. Maharashtra leads in GDP contribution and foreign investment. The state's debt is projected to increase.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026