राज्यात विधानसभेला किमान 30 उमेदवार उभे करणार !

By Admin | Updated: July 23, 2014 00:29 IST2014-07-23T00:29:14+5:302014-07-23T00:29:14+5:30

जनतेला दिलेली आश्वासने पूर्णपणो विसरुन, निवडणुकीपूर्वी देशातील भांडवलदारांना दिलेली आश्वासने सध्या पंतप्रधान मोदी पूर्ण करीत आहेत.

In the state assembly, at least 30 candidates will stand! | राज्यात विधानसभेला किमान 30 उमेदवार उभे करणार !

राज्यात विधानसभेला किमान 30 उमेदवार उभे करणार !

अलिबाग : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर मोदी सरकारने मोठा भ्रमनिरास केला असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्णपणो विसरुन, निवडणुकीपूर्वी देशातील भांडवलदारांना दिलेली आश्वासने सध्या पंतप्रधान मोदी पूर्ण करीत आहेत.  शेकापक्षाला आपली खटारा ही निशाणी परत मिळविण्यात यश आले आहे. कार्यकत्र्यानी खटारा ही निशाणी आता प्रत्येक मतदारार्पयत पोहोचवण्याचे काम करणो आवश्यक आहे. शेकाप राज्यात विधानसभेच्या 3क् जागांवर आपला उमेदवार उभा करेल, अशी घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी संध्याकाळी येथे बोलताना केली आहे. तसेच अलिबाग विधानसभा मतदार संघातील उमेदवार पक्षकार्यकत्र्याना विश्वासात घेवून, त्यांची मते जाणून घेवूनच निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
येत्या 2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळय़ाचे आयोजन यंदा खांदेश्वर येथे करण्यात आले आहे. त्याकरिता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात जागृती करण्याकरिता जिल्हाभर आयोजित मेळाव्यातील पहिल्या मेळाव्याचे आयोजन मंगळवारी येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, 
लोकसभा निवडणुकीत शेकाप कार्यकत्र्यानी प्रामाणिकपणो काम केले असल्याने आपली मते टिकून राहिली आहेत. 
विधानसभा निवडणुकीकरिता उरण मधून आमदार विवेक पाटील तर पनवेलमधून बाळाराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातील उमेदवार निश्चितीकरिता मतदार संघातील ग्रामंपचायतनिहाय दौरा 1क् ऑगस्टपासून आपण करणार असल्याचे त्यांनी सांगून चेंढेरे ग्रामपंचायतीमधील विजय आणि खटारा चिन्ह परत मिळणो हे आपल्याकरिता शुभशकून असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले. यावेळी शेकापचे अलिबाग व मुरुड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: In the state assembly, at least 30 candidates will stand!