शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी करणार सेवांचे मार्केटिंग

By admin | Updated: April 7, 2015 04:14 IST

खासगी वाहतुकीची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सेवांचे ‘मार्केटिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : खासगी वाहतुकीची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सेवांचे ‘मार्केटिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मार्केटिंग’चे धोरण निश्चित करण्यासाठी एसटीमार्फत एका खासगी एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. त्यानुसार एसटीच्या विविध सेवांचे ‘मार्केटिंग’ तसेच ‘बँडिंग’साठी प्रयत्न केले जातील.दरवर्षी एसटीची सुमारे ७ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. मात्र मागील काही वर्षांपासून खासगी वाहतूक सेवेमुळे एसटीच्या सेवेवर परिणाम होऊ लागला आहे. खासगी बससह इतर वाहनांशी एसटीला तीव्र स्पर्धा करावी लागत आहे. त्यातही योग्य मार्केटिंगअभावी एसटी पिछाडीवरच पडत आहे. साहजिकच तोटा वाढत चालल्याने प्रवाशांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा देण्यास कमी पडत आहे. सध्या एसटीमार्फत प्रवाशांसाठी अनेक योजना, उपक्रम राबविले जातात. मात्र, त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रवाशांपर्यंत पोहचत नाही. ‘लाल डब्बा’ म्हणून एसटीची सर्वसामान्यांच्या मनात प्रतिमा आहे. त्यामुळे यासर्व बाबींचा विचार करून एसटीने मागील वर्षी स्वतंत्र ‘प्लॅनिंग व मार्केटिंग’ विभाग सुरू केला. एसटीकडे बघण्याचा प्रवाशांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.संबंधित एजन्सी एसटीचे बँडिंग, बोधचिन्ह, बोधवाक्य, रंगसंगती तसेच इतर मार्केटिंगबाबतचा अभ्यास करेल, असे ‘लोकमत’शी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)