शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांसाठी विशेष डिग्री कॉलेज

By admin | Updated: May 25, 2014 00:48 IST

शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालयाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अपंगांसाठी विशेष डिग्री कॉलेज सुरु करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

केंद्र शासनाचा उपक्रम : अपंग जीवन विकास संस्थेकडे जबाबदारी

ंअमरावती : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालयाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अपंगांसाठी विशेष डिग्री कॉलेज सुरु करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या या उपक्रमाला राज्य शासनानेही मंजुरी दिल्याने लवकरच विद्यापीठात अपंगांसाठी डिग्री कॉलेज सुरु केले जाणार आहे.

केंन्द्र शासनाच्या सामाजिक व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत रिहाबलेशन काऊंसिल ऑफ इंडियाद्वारे अमरावती येथे अपंगांसाठी डिग्री कॉलेज (मूकबधिर प्रवर्ग) सुरु करण्याला मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या आदेशाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बृहत आराखड्यात अपंगांसाठी विशेष बी.एड. कॉलेज सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने राज्य शासनाने याला मान्यता दिली आहे. या उपक्रमामुळे अमरावती विभागाच्या शैक्षणिक विकासात भर पडली आहे. हे कॉलेज चालविण्याकरिता स्थानिक अपंग जीवन विकास संस्थेकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. ही संस्था अपंगांच्या शैक्षणिक सुविधेकरिता गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहे.

संस्थेद्वारा शहरात मूकबधिर प्रवर्गाचे राजीव गांधी डी.एड. कॉलेज चालविण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत मुंबई व पुणे या विद्यापीठात अपंगांसाठी डिग्री कॉलेज सुरु आहे.

अमरावतीमध्येही अपंगांसाठी विशेष कॉलेज सुरु होणार असल्याने आता अपंगांचा शैक्षणिक स्तर उंचावणार आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून यामध्ये फक्त २५ विद्यार्थ्यांना सीईटीद्वारे प्रवेश घेता येणार आहे.

रिहायबलेशन काऊंसिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार आवश्यक शुल्क भरुन विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. शासनाच्या शर्ती व अटींनुसार एससी, एसटी, व्हीजे,एनटी व ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)