शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतही मराठा क्रांती मोर्चाचा आवाज

By admin | Updated: October 12, 2016 19:11 IST

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदलासाठी महाराष्ट्रामध्ये निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्च्यांपासून प्रेरणा घेऊन दुबईमध्येही

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 12 -  कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदलासाठी महाराष्ट्रामध्ये निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्च्यांपासून प्रेरणा घेऊन दुबईमध्येही शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. दुबईमधील मराठा समाजाच्या नागरिकांनी भारतातील मराठा समाजाकडून केल्या जाणा-या मागण्यांना पाठींबा देण्यात आला. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे ही समाजाची मागणी योग्य असून शासनाने यावर गांभिर्याने विचार करावा अशी अपेक्षा या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केली. मराठा समाजावर होणारा अन्याय दुर्लक्षित केला जातो. त्याला वाचा फोडण्याची आवश्यकता आहे. राज्यात सर्वत्र लाखोंच्या संख्येने समाज मोर्चांमध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे विदेशातील मराठा समाजालाही स्फुरण चढले आहे. त्यामधून दुबईमधील जवळपास ७० मराठा नागरिकांनी एकत्र येत मोर्चाचे आयोजन केले. गेल्या दहा पंधरा वर्षांपासून दुबईमध्ये कामानिमित्त राहात असलेल्या मराठा समाजाच्या तरुणांचे मोबाईल क्रमांक आणि माहिती मिळवण्यात आली. त्यांचा व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यात आला. एकमेकांच्या संपर्कात राहून सर्वांना राज्यातील मराठा मोर्चांची माहिती आणि छायाचित्रे तसेच व्हिडीओ शेअर केले जात होते. दुबईमध्ये मोर्चा किंवा रॅली काढायला बंदी आहे. त्यामुळे केवळ एकत्रिकरण करुन मराठा समाजाच्या मागण्यांंना पाठींबा देण्यासाठी दुबई प्रशासनाकडून परवानगी मागण्यात आली होती. शारजा रस्त्यावर शहरालगतच्या एका वाळवंटी भागात सर्वांचे एकत्रिकरण करण्यात आले होते.ना कोणत्या पक्षाचा, ना कोणत्या संघटनेचा,  आव्वाज कुणाचा, वीर मराठ्यांचा असे फलक घेऊन तरुण या मोर्च्यात सहभागी झाले होते. हा मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्चाचे आयोजन रघुनाथ बापु सगळे-पाटील, विक्रम भीमराव भोसले, अभिजीत देशमुख, राजेश वाघ, सतिश शिर्के, प्रकाश पवार यांनी केले होते.