शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वेतनाच्या प्रश्नावर तोडगा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 04:12 IST

राज्यातील खाजगी आयटीआयमधील कर्मचा-यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने गुजरात आणि कर्नाटकमधील आयटीआयचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यातील खाजगी आयटीआयमधील कर्मचा-यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने गुजरात आणि कर्नाटकमधील आयटीआयचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियेत ही माहिती दिली.अशासकीय आयटीआयमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुनगंटीवर आणि महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. त्यात मुनगंटीवार यांनी एका महिन्यात गुजरात आणि कर्नाटकमधील आयटीआयचा अभ्यास करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही राज्यांतील आयटीआय प्रक्रियेची माहिती मिळताच योग्य धोरण तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आयटीआयप्रमाणेच अशासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे अशासकीय आयटीआयतील अनेक जागा रिक्त राहून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली होती. कर्नाटक, गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये अशासकीय आयटीआयमधील कर्मचाऱ्यांना शासनाचा आधार आहे. त्यामुळे तेथील कौशल्य विकासामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. याउलट आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया केलेल्या शासनाने शुल्कातही वाढ केल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी सांगितले. ...तर न्यायालयात धाव घेणारमागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्काची जबाबदारी शासनाने घेतली नाही, तर उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती संघटनेने दिली. शुल्कवाढीबाबत वित्तमंत्र्यांना विचारले असता सदर निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असून, त्याबाबतची माहिती मागवल्याचे त्यांनी सांगितले.