...म्हणून मीही तेजस ठाकरेचे व्हिडिओ पोस्ट केले; हॉटेलमधील त्या व्हिडिओ संदर्भात मोहित कंबोज स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:34 IST2026-01-20T10:33:21+5:302026-01-20T10:34:03+5:30
कोरोना काळात हॉटेलमध्ये मिंत्रांसोबत पार्टीकरतानाचा तेजस ठाकरेचा व्हिडिओ भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

...म्हणून मीही तेजस ठाकरेचे व्हिडिओ पोस्ट केले; हॉटेलमधील त्या व्हिडिओ संदर्भात मोहित कंबोज स्पष्टच बोलले!
देशभरात कोरोनाची साथ सुरू होती, सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू होता. मात्र, असे असतानाही उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेहॉटेलमध्ये गेले होते. कोरोना काळात हॉटेलमध्ये मिंत्रांसोबत पार्टीकरतानाचा त्याचा व्हिडिओ भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता यासंदर्भात एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मोठे भाष्य केले आहे.
तेजस ठाकरेचे व्हिडिओ माझ्या जवळ होते. मला ते पोस्ट करायचे नव्हते. कारण तेजस ठाकरे काही राजकीय पक्षाचा हिस्सा नाही. माझ्याकडे तेजस ठाकरेचे व्हडिओ त्या दिवशीच आले नाहीत, ते कोविड काळातील व्हिडिओ आहेत. तो माझ्या रेस्टॉरंटमध्ये आला होता. असा दावा मोहित कंबोज यांनी यावेळीही केली. ते एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
ज्या पद्धतीने संजय राउत यंनी माझ्या पत्नीवर आरोप केले, जीचा राजकारणाशी काहीही संबंधही नाही. ती कुठल्याही राजकीय पक्षाची सदस्य नाही. ती एक हाऊस वाइफ आहे. सोबतीने बिझने करते. जेव्हा पर्सनल आरोप केले गेले, तेव्हा मीही, जशास-तसेच उत्तर देण्यासाठी तेजस ठाकरेचे व्हिडिओ टाकले होते (पोस्ट केले होते), असेही मोहित कंबोज यांनी म्हणाले.