शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत शिंदे यांच्याकडे अखेर कल्याणची सुभेदारी!

By admin | Updated: May 17, 2014 02:11 IST

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अडीच लाखांच्या प्रचंड मताधिक्याने कल्याणच्या सुभेदारीवर शिक्कामोर्तब केले.

अनिकेत घमंडी/प्रशांत माने, कल्याण - अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अडीच लाखांच्या प्रचंड मताधिक्याने कल्याणच्या सुभेदारीवर शिक्कामोर्तब केले. मतमोजणीच्या शुभारंभापासूनच सोळा हजारी एक नंबरीची घोडदौड त्यांनी २४ फेर्‍यांमध्ये कायम ठेवली़ परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर मतमोजणीच्या तिसर्‍या फेरीतच काढता पाय घ्यावा लागल्याची नामुष्की ओढवली़ तर मनसेचे प्रमोद पाटील यांनाही, कसाबसा सातव्या फेरीपर्यंत तग धरल्यानंतर पराभवाची सावली पाठ सोडत नसल्याने येथून पळ काढावा लागला. २४ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात तब्बल ८ लाख ३० हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी विजयी उमेदवार डॉ़ शिंदे यांना ४ लाख ४० हजार ८९२ मते, तर आनंद परांजपे यांना १ लाख ९० हजार १४३ मते पडली. मनसेच्या पाटील यांना १ लाख २२ हजार ३४९, बसपाच्या दयानंद किरतकर यांना १९ हजार ६४३, तर आम आदमी पार्टीचे नरेश ठाकूर यांना २० हजार ३४७ मतांवर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुती, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला जरी दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरीही महायुतीच्या आणि त्यांच्या एकूण मतांमध्ये तब्बल २ लाख ५० हजारांची तफावत असून ही सर्व मते महायुतीच्या पारड्यात पडल्याने मतदान केंद्र परिसरात सकाळी साडेनऊपासून महायुतीच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. त्यात सकाळी १०.३०च्या सुमारास अचानक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी केंद्र परिसरातील पत्रकार कक्षाकडे कूच केल्याने महायुतीचा विजय निश्चित झाल्याचे संकेत मिळाले होते. कडक सुरक्षा व्यवस्थेनेही शिंदे प्रसिद्धीमाध्यमांना देत असलेल्या प्रतिक्रियांना रोखू न शकल्याने आठव्या राऊंडनंतर तो विजय निश्चित झाल्याचे दिसून आले. यावेळी नरेश म्हस्के, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, या विजयात मोलाची कामगिरी बजावलेले भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष सुनील चौधरी, उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, डोंबिवलीचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पहिल्या फेरीत परांजपेंना ७ हजार १२५, पाटील यांना ६ हजार ९११, तर डॉ. शिंदे यांना २१ हजार ९८६ मते मिळाली होती. तेव्हापासून २४व्या फेरीपर्यंत शिंदे यांनी मागे वळून पाहिलेच नाही, तर अन्य मुख्य प्रतिस्पर्ध्यांना १० हजाराचा टप्पा ओलांडूही दिला नाही. त्यामुळे अन्य दोन पक्षांचे कार्यकर्तेही केंद्र सोडून माघारी परतले. नोटा’ला पसंती या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या उमेदवारांपैकी एकही पसंत नसेल तर मतदारांना ‘नोटा’चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला होता. त्या पर्यायाला कल्याण लोकसभेतील तब्बल ९ हजार १८५ मतदारांनी आपला अधिकाराचा हक्क बजावत पसंती दिली. त्यामुळे या मतदारसंघातील उपर्‍यांसह स्थानिक उमेदवारांना नाकारल्याची भावना लोकप्रतिनिधींमध्ये चर्चेत होती. तीन यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड दरम्यान एकूण २४ फेर्‍यांमध्ये मतदान झालेल्या तीन यंत्रांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड उद्भवला. परिणामी या यंत्रांची मतमोजणी दुपारी ४ पर्यंत होऊ शकली नसल्याचे मतदान केंद्रातून सांगण्यात आले. याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.