शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...४५ टक्के सांगलीकर मानसिक समस्याग्रस्त!

By admin | Updated: October 9, 2014 23:48 IST

शहरातील स्थिती : आर्थिक ओढाताण, नैराश्य, कौटुंबिक वादविवाद, काळजीत वाढ झाल्याचे परिणाम

नरेंद्र रानडे- सांगली -शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याकडे आपण तितकेसे गांभीर्याने लक्ष देत नाही. परिणामी कित्येकजण मानसिक आजाराबाबत अनभिज्ञ असतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. मानसिक आजारांबाबत विज्ञान युगातही बहुतेकांचा कल वैद्यकीय सल्ला न घेता इतर अनावश्यक उपचार करण्याकडे असतो. सध्या महापालिका क्षेत्रात सुमारे ४५ टक्के नागरिक हे मानसिक समस्यांनी त्रस्त असल्याचा निष्कर्ष शहरातील ‘आकार फाऊंडेशन’ या सामाजिक संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत आपले स्थान टिकवायचे असेल, तर प्रत्येकाला तणावातून जावेच लागते. हा तणाव कमी करण्यासाठी कितीजण खंबीरपणे प्रयत्न करतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु बहुतांशीजण त्याचा सामना करण्याऐवजी त्यापासून दूर पळणेच श्रेयस्कर मानतात. हा देखील एक प्रकारचा मानसिक रोगच आहे. आजकाल अनेकांचा वेळ एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा सोशल मीडियावर सर्फिंग करण्यातच जातो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. परिणामी त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन वागण्यावर होतो. साहजिकच ताण-तणावात वाढ होते. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपध्दती असताना घरात सुसंवाद असायचा. कुटुंबासाठी लागणाऱ्या गरजा एकमेकांच्या सहकार्यातून भागवल्या जायच्या. पण सध्या विभक्त कुटुंब पध्दतीमुळे व वाढत्या महागाईमुळे कुटुंबात होणाऱ्या विसंवादाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यासह अनेक कारणांमुळे माणसांचे मानसिक आरोग्य निरोगी रहात नसल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती बदलण्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करुन आपले मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. लक्षणेचिडचिडेपणा करणे.नैराश्य टाळण्यासाठी मादक द्रव्यांचे सेवन.आपले म्हणणे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणेसतत नकारात्मक विचार करणे.मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. संकटांशी सामना कसा करावा याचे प्रशिक्षण नागरिकांना दिले पाहिजे. तर आत्महत्या, घटस्फोट आदी प्रमाणात निश्चित घट होईल.- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचारतज्ज्ञमानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा सकारात्मक परिणाम होतो. योगाद्वारे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणे सोयीचे जाते. साहजिकच मानसिक समस्यांपासून दूर राहण्यासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे.-श्याम वैद्य, पतंजली योग समिती, सांगली..मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय?धकाधकीच्या जीवनात आपल्या मनाची स्थिती स्थिर आणि शांत असणे आवश्यक आहे. समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवली, तर ताण न घेता त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्व परिस्थितीत मन सुदृढ राखणे म्हणजे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे होय. उपायविनाकारण कोणत्याही बाबीचा ताण घेऊ नये.वादविवाद करण्यापेक्षा सुसंवाद राखण्यास महत्त्व द्यावे.मानसिक व शारीरिक कष्टाची तयारी ठेवावी.वेळप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.