शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शिवतीर्थ ते सोशल नेटवर्क; सर्वत्र बाळासाहेब!

By admin | Updated: November 18, 2014 03:01 IST

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी आज शिवाजी पार्कपासून सोशल नेटवर्किंग साईटवर सर्वत्र बाळासाहेबांना मोठ्या प्रमाणावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी आज शिवाजी पार्कपासून सोशल नेटवर्किंग साईटवर सर्वत्र बाळासाहेबांना मोठ्या प्रमाणावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळपासूनच शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याचे चित्र शिवाजी पार्कवर पाहायला मिळाले. स्मृतिस्थळावर भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रचंड गर्दी आणि मोठी रांग असूनही वातावरणातील गांभीर्य तसूभरही कमी झाले नाही. अशीच स्थिती फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर पाहायला मिळाली. दिवसभर बाळासाहेबांच्या आठवणी जागविणारे मेसेज फॉरवर्ड केले जात होते. यात बाळासाहेबांचे उद्गार, त्यांच्या भाषणांच्या क्लिप्स्, दुर्मीळ छायाचित्रांसह श्रद्धांजली वाहणारी छायाचित्रे होती. तर, अनेक ग्रुप्सनी दिवसभरासाठी बाळासाहेब ठाकरे परिवार, एकच साहेब, आपले साहेब... अशी नावे धारण केली. भगवा झेंडा, बाळासाहेबांचे विविध फोटो ग्रुपचे आयकॉन म्हणून ठेवलेले पाहायला मिळाले. (प्रतिनिधी)