मी मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची इच्छा

By Admin | Updated: May 30, 2014 08:45 IST2014-05-30T02:23:22+5:302014-05-30T08:45:53+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Shivsena's will to be the Chief Minister, I want to be Chief Minister | मी मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची इच्छा

मी मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची इच्छा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आपण मुख्यमंत्री व्हावे, ही शिवसैनिकांची मागणी असून राज्यात इतरही काही जण मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगत असल्याचे सांगत उद्धव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. याआधी राज्यात उद्धव यांनी मुख्यमंत्री होण्याची मागणी करणारे बॅनर शिवसैनिकांनी लावले होते. मनसेच्या चिंतन बैठकीनंतर राज ठाकरे यांनी स्वत:चे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी केली होती. त्यावर गुरुवारी दुपारी मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेतल्यानंतर उद्धव पत्रकारांसोबत बोलत होते. ‘चर्चा नको, कृती करा’ जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या ३७० या विशेष कलमावर केंद्र सरकारने चर्चा करण्यापेक्षा कृती करण्याचा सल्ला देत त्यांनी भाजपाला आव्हान दिले. सध्या हे विशेष कलम काढून टाकण्याबाबत केंद्रस्तरावर चर्चा सुरू असून संघ आणि काश्मिरातील नेते विविध मते व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's will to be the Chief Minister, I want to be Chief Minister