शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसविला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Updated: May 17, 2025 00:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा उभारण्यात आल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेश पांडे, नागपूर: रात्रभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा उभारण्यात आला. त्यानंतर शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मौजा खैरी येथे हा प्रकार घडला आहे. १४ मे रोजी रात्री दोन ते चार वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी मुख्य मार्गाच्या बाजूला शासकीय जागेत ग्रामपंचायतीने लावलेले पेव्हर ब्लॉक्स फोडले आणि तेथे विटांच्या मदतीने पाच फुटांचा चौथरा तयार केला. त्यानंतर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा पुतळा कुणी उभारली, याची कुणालाही माहिती नव्हती. मात्र, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सचिव निळकंठ माणिकराव देवगडे यांनी तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र