शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचेच नुकसान !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:59 PM

थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने फिरकी घेतली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खुद्द राष्ट्रवादीला देखील त्यांच्या भाजप प्रवेशाचा धक्का बसला आहे. उदयनराजे यांच्या निर्णयाने भाजपचा फायदा आणि राष्ट्रवादीला धक्का बसला असला तरी नुकसान तर शिवसेनेचेच होणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवला होता. त्यावेळी ही जागा युतीकडून शिवसेनेने लढवली होती. साताऱ्याची जागा आधीपासूनच शिवसेनेकडे आहे. मात्र आता उदयनराजे भाजपमध्ये आले म्हटल्यावर शिवसेनेला ही जागा भाजपसाठी सोडवी लागणार आहे. अर्थात लोकसभेला लढविण्यासाठी मिळणाऱ्या जागांपैकी शिवसेनेची एक जागा कमी होणार आहे. हे शिवसेनेचे एकप्रकारे नुकसानच आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी लढवली होती. त्यात त्यांना ४ लाखांहून अधिक मते मिळाली होती. आता उदयनराजे भाजपमध्ये आल्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एकूणच या जागेवर युती काय तोडगा काढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तत्पूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजे यांच्यावर शिवसेनेने आग्रलेखातून टीका केली आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने फिरकी घेतली आहे. उदनयराजेंनी भाजप प्रवेशावेळी कॉलर उडवली नसल्याचा दाखलाही सामनातून देण्यात आला आहे. एकूणच नुकसान होणार असल्यामुळे तर शिवसेनेकडून उदयनराजे यांच्यावर टीका करण्यात आली का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019