शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष

By यदू जोशी | Updated: January 25, 2020 06:37 IST

आता आदित्यनंतर सव्वानऊ वर्षांनी राजकारणात उतरलेले राज यांचे पुत्र अमित यांची तुलना आदित्य यांच्याशी होईलच. अर्थात, राजकीय वाटचालीत आदित्य हे बरेच पुढे आहेत...

- यदु जोशीमुंबई : ‘आदित्यला सांभाळा’ असे भावनिक आवाहन करीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १० ऑक्टोबर २०१० रोजी दसरा मेळाव्यात नातू आदित्य यांना राजकारणात आणले. त्याच्या सव्वातीन वर्षे आधी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्याने ठाकरे घराण्यातील फूट उघड झाली होती. पुढील काळात उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आता आदित्यनंतर सव्वानऊ वर्षांनी राजकारणात उतरलेले राज यांचे पुत्र अमित यांची तुलना आदित्य यांच्याशी होईलच. अर्थात, राजकीय वाटचालीत आदित्य हे बरेच पुढे आहेत.बाळासाहेबांच्या आशीर्वादाने व वडील उद्धव यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले असताना आदित्य राजकारणात आले. त्यांचा प्रवेश हा सुकर होता आणि त्यांना भक्कम पाठबळ होते. लाखो शिवसैनिकांची फौज सोबत होतीच. मात्र, मनसेचा पूर्वीसारखा प्रभाव राहिलेला नसताना, राज यांच्या नेतृत्व व भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागलेले असताना म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीत अमित यांची राजकीय इनिंग सुरू झाली आहे. आदित्य यांच्या तुलनेने त्यांचा राजकीय प्रवास खडतर असेल. आदित्य हे मिळालेले नेतृत्व सिद्ध करीत आहेत, तर अमित यांना ते नेतृत्वासाठी सक्षम असल्याचे सिद्ध करायचे आहे.

२९ वर्षीय आदित्य हे अविवाहित आहेत. २७ वर्षीय अमित यांचा विवाह गेल्या जानेवारीत पाच वर्षांपासूनची मैत्रीण मिताली बोरुडे हिच्याशी झाला. मितालीचे वडील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहेत. आदित्य राजकारण प्रवेशानंतर पक्षात अधिक सक्रिय झाले. युवासेनेचे प्रमुख झाले. विविध आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला. अमित यांना राजकारणात आणण्यापूर्वी राज यांनी त्यांना मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबईत फिरून मनसैनिक, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला पाठविले. मुंबईतील मनसेच्या जवळपास प्रत्येक शाखेत जाऊन त्यांनी संवाद साधला.अमित यांच्या राजकारण प्रवेशाची मनसेच्या अधिवेशनात घोषणा होताना राज ठाकरे अधिवेशनात होते, पण त्यांनी व्यासपीठावर जाण्याचे टाळले. आदित्य यांचे लहान बंधू तेजस हे लवकरच राजकारणात सक्रिय होतील अशी शक्यता आहे. बहुदा युवासेनेचे प्रमुख केले जाईल, अशी चर्चा आहे. अमित यांच्या बहीण उर्वषी या चित्रपट दिग्दर्शन, फॅशन डिझायनिंग यात करिअर घडवू पाहत आहेत. आदित्य यांच्या पाठीशी उद्वव यांच्याप्रमाणेच त्यांच्या आई रश्मी ठाकरे भक्कमपणे उभ्या असतात. अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे या त्यांच्या राजकारण प्रवेशावेळी हजर होत्या आणि अमित पक्षाचे नेतेपद स्वीकारत असताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अमितची तुलना मला कोणाशीही करायची नाही, त्याने लोकसेवा करीत राहावी, एवढीच इच्छा आहे, अशी नम्र प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली.

दोघांमधील साम्य : नम्र स्वभाव, लोकसंग्रहाची आवड, राज्यापुढील प्रश्न जाणून घेण्याची इच्छा.शिवसेना असो की मनसे, दोघांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असेल. दोन वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत आदित्य विरुद्ध अमित असा संघर्षही बघायला मिळू शकेल. त्यापूर्वी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत अमित यांना सक्रिय केले जाईल. काल त्यांनी नेतेपद स्वीकारल्यानंतर जाणवलेली बाब म्हणजे, अमित यांना भाषण, सभाधीटपणा याची तयारी करावी लागेल. त्याबाबत आदित्य पूर्ण तयार नसले तरी उजवे आहेत.संवादाचा दरवाजा उघडलाआदित्य हे वडिलांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. आधी मातोश्रीवर आणि आता मंत्रालयात थेट उद्धव ठाकरेंना भेटणे शक्य नसेल तर लोकांना आदित्य यांचा पर्याय असतो. राज यांच्याशी बोलताना आम्हाला बरेचदा दडपण येते, पण अमित यांच्याशी सहज बोलता येते. त्यामुळे संवादाचा दरवाजा आमच्यासाठी उपलब्ध झाला अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाºयाने दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAditya Thackreyआदित्य ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेPoliticsराजकारण