शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:17 IST

Shiv Sena Shinde Group News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात राज्यभरातून पक्षप्रवेश होत असल्याचे दिसत आहे.

Shiv Sena Shinde Group News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. तर महाविकास आघाडीही यात मागे नाही. असे असले तरी सर्वच पक्षांत प्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. अहिल्यानगर आणि तुळजापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश झाले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राहुरी तालुका शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे रामचंद्र राजुभाऊ शेटे पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच तुळजापूर तालुक्यातील अर्जुन सलगर आणि त्यांच्या असंख्य साथीदारांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

उद्योजक धनुभाऊ घुगरकर, उद्योजक ज्ञानेश्वर टेकाळे, ऍड.भाऊसाहेब पवार, उमेश खिलारी तसेच सरपंच चंद्रकांत आढाव, उपसरपंच सुभाष जुंदरे, श्याम तोडमल, संदीप आढाव, योगेश नालकर, ऍड.चंद्रशेखर शेळके, संदीप बोरुडे, संदीप थोपटे, बाळासाहेब वाघ, आकाश हारदे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, मुंबई महानगर पालिका निवडणूकीपूर्वी बोरिवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटासह भाजपला मोठे खिंडार पडले आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ठाकरे गटाच्या शाखा समन्वयक भूषण माळदवेंसह  शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. तसेच भाजपा कांदिवली पूर्व विधानसभा सचिव दिपाली माटे यांनीही शक्तिप्रदर्शन करत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते सर्व ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena Gains Strength in Ahilyanagar, Tuljapur; Mass Joining

Web Summary : Shiv Sena (Shinde faction) expands in Ahilyanagar and Tuljapur with significant entries, including leaders from various sectors. The move strengthens the party before local elections, mirroring similar gains in Mumbai.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक