शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

“मराठी तरुणांची मानसिकता...”; शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:08 IST

Gulabrao Patil News: बिहारचा माणूस इथे येऊन पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका करतो. तुम्ही का टीका करता, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

Gulabrao Patil News: नोकऱ्या आहेत, ती करण्याची मानसिकता नाही. बिहारचा माणूस इथे येऊन पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका करतो. तुम्ही का टीका करता. मराठी माणसात काम करण्याची मानसिकता नाही. कोण म्हणत आहे की, काम नाही. काम आहे. तरुणांना राग आला तर आला. कारण आता ४ वर्षांनी निवडणुका आहेत. तेंव्हाचे तेव्हा बघ, असे शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जळगावातील एका कार्यशाळेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आपण नुसत्या गोष्टी ऐकतो अंबानी असा होता तसा होता, त्यांनी पण शून्यापासून सुरुवात केली. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही पण प्रयत्न करून बघा ना, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला. मी काय राजकारणी होतो का? मात्र आता आमच्या धंद्यात पण आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक गोष्टींमध्ये नैपुण्य दाखवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

एमआयडीसीला 'डी प्लस' दर्जा मिळण्यासाठी सात वर्षे लढलो

जळगावच्या एमआयडीसीला 'डी प्लस'चा दर्जा मिळावा यासाठी सात वर्षे लढलो. सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले. शेवटी हा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. आमच्या आजूबाजूला सर्व जिल्ह्यांना एमआयडीसी मध्ये दर्जा होता. मग आम्हाला का नाही? आम्ही का दुसऱ्याचे लेकरू होतो का या शब्दात बोललो, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली.

दरम्यान, छोटे छोटे उद्योग आले तरच इतर उद्योग मोठे होतील. जळगाव जिल्ह्यातील केळीवर आधारित उद्योगांची मोठी गरज आहे. राज्यातल्या सर्व अंगणवाड्यांमधील पोषण आहारात केळीचा समावेश करा, याबद्दलची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Patil's remark sparks row over Marathi youth mindset.

Web Summary : Minister Gulabrao Patil's statement on Marathi youth's work ethic ignited controversy. He urged them to pursue entrepreneurship, citing the need for diligence and highlighting efforts to improve local industrial development, emphasizing the potential of agro-based industries.
टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाMIDCएमआयडीसी