शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना पोलीस कोठडी

By admin | Updated: June 16, 2016 21:11 IST

शिवसेनेचे उपनेते व जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना आज न्या.एस.पी. देवरे यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 16-  म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत नवीन कार्यकारिणी गठीत करून फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी शिवसेनेचे उपनेते व जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना आज न्या.एस.पी. देवरे यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

न्यायालयात आले सकाळी ११ वाजता शरण

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून आमदार गुलाबराव पाटील यांनी आधी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज २४ मे २०१६ रोजी न्यायाधीश ए. के. पटणी यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. तेथेही १३ जून रोजी अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अखेर गुलाबराव पाटील १६ जून रोजी जळगाव येथील न्या.एस.पी. देवरे यांच्यापुढे सकाळी ११ वाजता शरण आले. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्या. देवरे यांनी त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. काय आहे प्रकरण ?

१९९१ मध्ये म्हसावदच्या पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना झाली होती. त्यानंतर २०१२ पर्यंत संस्थेचे ६ सभासद हे मयत झाले होते. असे असताना आमदार गुलाबराव पाटील यांनी २० एप्रिल २००८ रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अजेंडा काढला. त्यानंतर ३० एप्रिल २००८ रोजी ही सभा घेण्यात आली. संस्थेचे सभासद महारू काशीनाथ बेलदार हे १८ आॅगस्ट १९९६ रोजी मयत झालेले असताना ते सभेला हजर असल्याचे दाखवण्यात आले. तसा उल्लेख प्रोसेडिंगमध्ये करून सभेत नवीन कार्यकारिणी गठीत केली होती. याप्रकरणी अर्जुन लटकन पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून २०१२ मध्ये औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुलाबराव पाटलांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.