शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात परतण्यास शरद पवारांचा नकार

By admin | Updated: June 9, 2014 02:31 IST

मी दिल्लीतच बरा आहे, नको त्या चर्चा करण्याची गरज नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

मुंबई : ‘मी दिल्लीतच बरा आहे, नको त्या चर्चा करण्याची गरज नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. पण त्याचवेळी सामूहिक नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढविली जाईल, असे सांगत मुख्यमंत्रिपदाची आस बाळगून असलेले अजित पवार यांच्या मनसुब्यांना मात्र धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित सोहळ्यात पवार बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव, विधानसभा निवडणुकीआधी नेतृत्व जाहीर करण्याची अजित पवार यांनी केलेली मागणी आणि शरद पवार यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची पुढे आलेली मागणी, या सर्व घडामोडींमुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अर्ध्या तासाच्या भाषणात पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. १५ वर्षे सत्तेत राहिल्यामुळे नेता व कार्यकर्ता यांच्यातील दरी अधिक वाढली आहे. आपल्या विभागात विकासकामे केल्याची आकडेवारी नेते मांडतात. पण, केवळ विकासकामे करून भागत नाही. त्याला माणुसकीचा चेहराही हवा असतो. त्यामुळे जनतेशी सुसंवाद ठेवत विकासकामे करा, अशा कानपिचक्या पवारांनी दिल्या. ज्या कार्यकर्त्यांच्या जिवावर पक्ष उभा आहे, त्यांचा सन्मान ठेवा. कार्यकर्त्याने हात दाखवला तर गाडी थांबवा, काच खाली करून त्यांच्याशी बोला. त्यांना सन्मान दिला नाही, तर ते जागा दाखवतात, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)