शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची नाराजी दूर, अनंत गीते स्वीकारणार पदभार

By admin | Updated: May 28, 2014 10:44 IST

शिवसेना नेते अनंत गीते यांना देण्यात आलेल्या अवजड उद्योग खात्यावरून सेनेत सुरू झालेले नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आले असून गीते आज पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २८ - शिवसेना नेते अनंत गीते यांना देण्यात आलेल्या अवजड उद्योग खात्यावरून सेनेत सुरू झालेले नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आली असून गीते आज सकाळी ११ वाजता पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. दरम्यान  शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
लोकसभा निवडणुकीत सेनेचे तब्बल १८ खासदार निवडून आल्यानंतरही केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते यांच्या रूपाने शिवसेनेच्या वाट्याला एकमेव कॅबिनेट मंत्रिपद आले होते. त्यामुळे सेनेत नाराजी पसरली होती. त्याच पार्श्वभूमीवर शपथविधीनंतर मंगळवारी मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी पदभार स्वीकारला तरी गीतेंनी पदभार स्वीकारला नव्हता. तसेच खाते बदलून देण्याची मागणी सेनेने दिल्लीत भाजपाच्या नेत्यांकडे केली होती. मात्र अखेर बुधवारी सेनेने पद स्वीकारण्यास मान्यता दर्शवली आणि अनंत गीते पदाचा कार्यभार स्वीकारण्यास तयार झाले. 
भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही मोदींनी इतर घटक पक्षांची आवर्जून आठवण ठेवली. मात्र तरीही सेनेने नाराजी दर्शवली.  केंद्र सरकारमध्ये  भाजप व सेना वगळता इतर पक्षांचे बलाबल पाहता; जे मंत्रालय मिळाले आहे, ते निमूटपणे स्वीकारण्याशिवाय शिवसेनेला गत्यंतर नसून त्याच पार्श्वभूमीवर कालपर्यंत नाराज असलेल्या गीतेंनी आज अचानक पदभार स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे स्पष्ट होत आहे.