शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेंचचा वाघ पुण्याला रवाना होणार !

By admin | Updated: August 24, 2014 01:16 IST

अखेर पेंचमधील वाघ पुणे शेजारच्या कात्रज येथे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी पुणे येथील वन विभागाचे एक पथक गाडी व पिंजऱ्यासह गत शुक्रवारीपासून नागपुरात दाखल झाले आहे.

पुण्याचे पथक दाखल : वन्यजीव प्रेमींचा विरोध नागपूर : अखेर पेंचमधील वाघ पुणे शेजारच्या कात्रज येथे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी पुणे येथील वन विभागाचे एक पथक गाडी व पिंजऱ्यासह गत शुक्रवारीपासून नागपुरात दाखल झाले आहे. दुसरीकडे पेंच कार्यालयातील वन अधिकारी व कर्मचारी गत दोन दिवसांपासून एन्क्लोजरमधील त्या वाघाला पिंजऱ्यात कैद करण्याच्या कामाला लागले आहेत. परंतु माहिती सूत्रानुसार शनिवारी रात्री उशिरापर्यंत तो पिंजऱ्यात पोहोचलेला नव्हता. त्यामुळे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, तो वाघ पिंजऱ्यात पोहोचताच, पुणे येथील पथक त्याला घेऊ न लगेच पुण्याकडे रवाना होणार आहे. विदर्भातील ‘वाघ’ हा उपराजधानीची ओळख बनला आहे. त्यामुळेच नागपूरला ‘टायगर कॅपिटल’ चा दर्जा मिळावा, अशी मागणी रेटली जात आहे. परंतु अशा स्थितीत नागपूर वन विभागाने विदर्भातील वाघ पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याचा घाट घातला आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते, पेंच व्याघ्र प्रकल्पातील या वाघाला पुणे शेजारच्या कात्रज येथील राजीव गांधी ज्युलॉजिकल पार्कमध्ये पाठविण्यात येत आहे. मात्र वन विभागाच्या या निर्णयाचा विदर्भातील वन्यजीव प्रेमी संघटना व काही स्थानिक नेत्यांनी तीव्र विरोध करीत आहे. विदर्भातील वाघ येथेच राहावा, म्हणून त्याला महाराज बागेतील प्राणिसंग्रहालयात ठेवण्याची मागणी केली जात आहे. परंतु वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अडेल भूमिकेमुळे विदर्भातील एक वाघ कमी होण्याची वेळ आली आहे. असा घडला घटनाक्रम.. सध्या हा वाघ पेंच व्याघ्र प्रकल्पातील एन्क्लोजरमध्ये राहत आहे. शिवाय त्याच्यासोबत पुन्हा दोन वाघिणीही आहेत. वन विभागाने सुरुवातीला या तिन्ही वाघांना जंगलात सोडण्याची योजना तयार केली होती. त्यासाठी गत जानेवारी महिन्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व वन्यजीव तज्ज्ञांची एक चमू पेंच येथे आली होती. त्या चमूने तिन्ही वाघांचे निरीक्षण करून, येथील केवळ दोन वाघिणीच जंगलात सोडण्याच्या स्थितीत असून, वाघ हा जंगलात सोडण्यासाठी ‘अनफिट’ असल्याचे सांगितले होते. त्यावर वन विभागाने त्याला महाराज बागेत ठेवण्याची तयारी दर्शविली होती.परंतु महाराज बाग प्रशासनाने त्या वाघाच्या बदल्यात येथील अन्य एक वाघिण वन विभागाने स्वीकारावी, अशी अट घातली होती. वन विभागाने ती अट फेटाळून, वाघाला कात्रज घेणे पाठविण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे महाराज बाग प्रशासनाला वन विभागाचा हा निर्णय कळताच, त्यांनी माघार घेत, वाघाला महाराज बागेत ठेवण्याची तयारी दर्शवून त्यासंबंधी वन विभागाला पत्र दिले. परंतु आता वन विभागाने वाघ हा कात्रच येथेच जाणार, अशी ताठर भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)