शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

बोअरमध्ये पडलेल्या चिमुरडीला वाचविले

By admin | Updated: September 19, 2015 22:44 IST

उघड्या बोअरमध्ये पडलेल्या ३वर्षीय चिमुरडीला ग्रामस्थांसह प्रशासनाच्या सव्वा तासाच्या अथक परिश्रमानंतर वाचवण्यात यश आले.

चांदा (जि़ अहमदनगर) : उघड्या बोअरमध्ये पडलेल्या ३वर्षीय चिमुरडीला ग्रामस्थांसह प्रशासनाच्या सव्वा तासाच्या अथक परिश्रमानंतर वाचवण्यात यश आले.शनिवारी सकाळी अंगणवाडीत जाताना श्रेया रवींद्र गायकवाड (३) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उघड्या बोअरमध्ये पडली़ घराबाहेर उभ्या असलेल्या तिच्या पालकांनी श्रेयाला बोअरमध्ये पडताना पाहिले आणि तिच्याकडे धाव घेतली़ श्रेया हळूहळू खाली सरकत होती़ पालकांनी तिला वाचविण्यासाठी बोअरमध्ये हात घालून पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन जेसीबी बोलावण्यात आले़ त्यानंतर बोअरच्या बाजूने उकरण्यास सुरुवात झाली. पोलिसांसह तहसीलदार हेमलता बडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या़ श्रेया, सुमारे १२ फूट खोलवर बोअरमध्ये अडकलेली होती़ तिच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते़ जेसीबीच्या साहाय्याने बोअरला समांतर १२ फुटांपर्यंत खड्डे खोदून श्रेयाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले़जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिकाही घटनास्थळी होती. डॉ़ बीक़े.शिरसाट यांनी बोअरमध्ये अडकलेल्या श्रेयाला आॅक्सिजन पुरविला़ बोअरमधून काढल्यानंतर श्रेयाला बोलता येत नव्हते़ डॉ़ शिरसाट यांनी प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ सायंकाळपर्यंत श्रेया बोलू लागल्याचे डॉ़ नरेंद्र मुळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ (वार्ताहर)