शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

महिला डॉक्टरचा मृत्यू: राज्यभरात आंदोलन; आज ओपीडीवर बहिष्कार, रुग्णसेवेचा बोऱ्या वाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 11:57 IST

Phaltan Doctor Death: अतितत्काळ विभागातील सेवा मात्र नियमितपणे सुरू राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी लवकरात लवकरच चौकशी होऊन न्याय मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार सोमवारी राज्यभर ओपीडी सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला असून, त्यामुळे सरकारी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद राहणार असून राज्यभरातील रुग्णसेवा ठप्प होण्याची भीती आहे. दरम्यान, अतितत्काळ विभागातील सेवा मात्र नियमितपणे सुरू राहणार आहे.

या आंदोलनाचा मुंबईतील महापालिकेच्या केइएम, सायन, कूपर, नायर, जेजे आणि जीटी रुग्णालयातील ओपीडी सेवेवर परिणाम दिसून येणार आहे. या आंदोलनात निवासी डॉक्टर संघटना, वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटना, इंटर्न्स संघटना, शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनाचा सहभाग असणार  आहे. 

प्राध्यापक सेवा देणार

डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पालिका व शासकीय रुग्णालयातील ओपीडी सेवा सुरळीत राहावी, याकरिता प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक सेवा देणार आहे.  

कॅण्डल मार्च

मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी एकत्र रविवारी कॅण्डल मार्च करून या घटनेचा निषेध केला.

आंदोलनात निवासी डॉक्टर

आयएमए आणि शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने दि. ७ नोव्हेंबरपासून ओपीडी सेवेवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास दि. १४ नोव्हेंबरपासून सर्व आपत्कालीन सेवा बंद करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये सर्व निवासी डॉक्टर सहभागी होतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's Death Sparks Statewide Protest; OPD Services Boycotted Today

Web Summary : Maharashtra doctors strike after a doctor's death, halting OPD services statewide. Residents and medical associations join, impacting major hospitals. Professors will cover duties. Candle marches held in protest. Further action threatened if demands unmet.
टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStrikeसंप