शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकारामांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वारकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 11:32 IST

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट

नागपूर: काल सर्व गीता तोंडपाठ असल्याचं सांगत गीतेतील एक श्लोकही पूर्ण म्हणू न शकलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आज नव्या वादात सापडले आहेत. संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता, असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. फेसबुक लाईव्हदरम्यान आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर आव्हाड यांनी त्यांचा व्हिडीओ फेसबुकवरुन हटवला. तुकाराम महाराजांचा खून झाला होता, असं आव्हाड फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले. त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आव्हाडांकडून वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ डिलीट करण्यात आला. आव्हाडांच्या विधानानं भावना दुखावल्याची प्रतिक्रिया वारकरी संप्रदायानं नोंदवली. तुकाराम महाराजांबद्दल असं बोलण्याचं धाडस आव्हाडांनी केलंच कसं?, त्यांच्या या विधानाबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशा प्रतिक्रिया वारकरी संप्रदायानं नोंदवल्या आहेत.याआधी काल जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना मला गीता तोंडपाठ असल्याचं म्हटलं होतं. यावेळी एका पत्रकारानं त्यांना गीतेतील एक श्लोक म्हणण्यास सांगितलं. मात्र जितेंद्र आव्हाड यांना श्लोक पूर्ण करता आला नाही. याशिवाय त्यांचे अनेक उच्चारदेखील चुकले. यानंतर आव्हाड श्लोक म्हणण्यास सांगणाऱ्या पत्रकारावरच भडकले. तुम्ही नंतर बाजूला या. मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवतो, असं आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर