शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:08 IST

राज्याचा मुख्यमंत्री हा काही एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नसतो. ते ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत...

ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. तर ठाकरे बंधूंना ० जागा मिळाल्या. यानंतर, आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधान आले आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, "एवढा त्रास करून घ्यायची गरज नाही कुणाला. आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?" असे राऊत यांनी म्हटले आहे.

आम्हाला माहीत आहे, काय आहे ते? -मुख्यमंत्री आणि राज ठाकरे भेटीसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, "जर मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल, तर ती होऊ द्या ना. राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकवेळा भेटले आहेत. गणपतीचे दिवसत आहेत. घरो घरी गणपती येत असतात. ते कदाचित गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यासंदर्भातील काही प्रश्न असतील. ज्या पद्धतीने फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली. मुंबईल बुडाली काय? दोन दिवस मुंबई बुडतेय. मुंबई, ठाणे नाशिक सारखी शहरे बुडाली. राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल. त्यामुळे एवढा त्रास करून घ्यायची गरज नाही कुणाला. आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?

"कशाला सांगू? आम्हाला माहीत आहे..." -यावर काय आहे नेमकं? असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले, कशाला सांगू? आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. आता येथे आम्हीही अनेकदा भेटतो. म्हणून त्यावर चर्चा कशासाठी करायची? यापूर्वीही ते भेटले आहेत. भेटूदेत ना. कोण कशासाठी भेटतंय? हे भेटणारे नेतेच सांगू शकतात आणि काय चर्चा झाली. दोन प्रमुख नेते बेटत आहेत. यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत. त्या दोघांमध्ये आता बंद दाराआड चर्चा सुरू असेल, असे तुम्ही म्हणत आहात. तर, त्यांनीच सांगायला हवे की आम्ही का भेटलो? राज ठाकरे यांचा स्वभाव बघता, त स्पष्ट आणि परखडपणे या भेटीसंदर्भात बोलतील.

"मुख्यमंत्री हा काही एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नसतो..." -दरम्यान, एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसता शिवसेना-मणसे, आणि त्याच दरम्यान ते भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो? असे विचारले असता राऊत म्हणाले, "ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत लक्षात घ्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणे हा काही राजकीय अपराध नाही. उद्या माझे काही काम असेल, उद्धव ठाकरे यांचे काही सामाजिक काम असेल, तर त्यांनीही भेटायला हवे. राज्याचा मुख्यमंत्री हा काही एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नसतो. ते ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना