शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

संगनमताने सव्वा लाखाचा अपहार

By admin | Updated: June 10, 2016 01:13 IST

माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंचपदावरून गेल्यानंतर देखील संगनमताने सव्वा लाखाचा अपहार करून फसविले आहे

यवत : डाळिंब ग्रामपंचायतीच्या बँकेतील खात्यातून माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंचपदावरून गेल्यानंतर देखील संगनमताने सव्वा लाखाचा अपहार करून फसविले आहे, अशी तक्रार विद्यमान सरपंच मंगल चंद्रकांत सुतार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांची कसून चौकशी करून फसवणुकीचा व अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मंगल सुतार यांनी केली आहे.मंगल सुतार या डाळिंब ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर १६ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर ग्रामपंचायतीची मासिक सभा ७ जानेवारी २०१३ रोजी झाली. या सभेने सुतार यांना ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची बँकेतील खाती त्यांचे व ग्रामसेवक यांच्या सहीने चालविण्याचा अधिकार दिला. या ठरावाची प्रत तत्कालीन ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांनी संबंधित बँकेला विहित मुदतीत न दिल्यामुळे यवत येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्रामपंचायतीच्या खात्यामधून १५ एप्रिल २०१३ रोजी राहुलदादा कुल स्वयंरोजगार संस्थेच्या नावाने १ लाख २० हजार ८२९ रुपयांचा धनादेश व याच दिवशी राजेंद्र रामचंद्र म्हस्के यांच्या नावे ३ हजार ९४२ रुपयांचा धनादेश तत्कालीन सरपंच धनंजय म्हस्के व ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांच्या सहीने वटविण्यात आला. या बाबीमुळे अधिकार नसतानादेखील ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार संबंधित तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी सुरू ठेवल्याचे व अफरातफर केल्याचे निदर्शन येत आहे. तक्रारी अर्जात सुतार यांनी सविस्तर माहिती दिली असून, अधिकार गेल्यानंतरदेखील वटविलेल्या धनादेशाची प्रतदेखील जोडल्या आहेत. नवीन सरपंचांना सह्यांचे अधिकार देण्याच्या ठरावाला स्वत: तत्कालीन सरपंच धनंजय म्हस्के हेच सूचक आहेत. या ठरावाची प्रत त्या वेळचे ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांनी तत्काळ ग्रामपंचायतीची खाती असलेल्या बँकांमध्ये देणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक त्यांनी टाळाटाळ केली. यामुळे संबंधित माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमताने हा प्रकार केला आहे. मागास समाजातील आहात, गावात नीट राहामहिला सरपंच असल्याने पाच वर्षे गावातील कामकाज चालविण्याची संधी मिळाली आहे. कमी शिक्षण असल्याने त्याचा आपण फायदा घेऊ आणि वाटेल ती चुकीची कामे करण्यास आपण भाग पाडू, अशी आशा गावातील काही चुकीच्या वृत्तीच्या राजकीय पुढाऱ्यांना होती. त्यांच्याकडून कायम ग्रामपंचायतीमध्ये कामकाजात अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चुकीची कामे करणार नाही असा ठाम निर्णय घेतल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आणि त्यांनी कामकाजात अडचणी आणण्यास सुरुवात केली. आमचे ऐकले नाही तर इतर मागास समाजातील आहात, गावात नीट राहा, अशी धमकीवजा सूचना देण्यात आल्या. सरपंचपदावरून हटविण्याचा प्रयत्नदेखील त्यांनी केला. यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार नीट तपासले असता त्यांची चुकीची कामे झाकण्यासाठी असा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आले. मात्र त्यांचे पितळ आता उघडे पडणार असून, लवकरच शासनदरबारी आपल्याला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया मंगल सुतार यांनी दिली.दोन दिवसांत सविस्तर खुलासा देऊ...माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यपद गेल्यानंतरदेखील ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार सुरू ठेवणे व धनादेश वटविले असल्याप्रकारणी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय म्हस्के यांनी याबाबत दोन दिवसांत सविस्तर खुलासा देऊ, असा खुलासा ‘लोकमत’कडे दिला. तर याबाबत गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़