नगरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे समर्पण

By Admin | Updated: August 22, 2015 00:48 IST2015-08-22T00:48:34+5:302015-08-22T00:48:34+5:30

गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावरील हल्ल्यानंतर फरार झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या १३ कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलिसांसमोर समर्पण केले

Sambhaji Brigade workers' dedication to the city | नगरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे समर्पण

नगरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे समर्पण

अहमदनगर : गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावरील हल्ल्यानंतर फरार झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या १३ कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलिसांसमोर समर्पण केले. शनिवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़
ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्यासह १३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. नगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या परिसरात सकाळी कार्यकर्ते जमले होते़ बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरोधातील आंदोलनाला यश न आल्याने त्यांनी शिवाजी महाराजांची माफी मागत घोषणाबाजी केली़ त्यानंतर ते पोलिसांच्या वाहनात स्वत:हून बसले़
शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Sambhaji Brigade workers' dedication to the city