शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

अजय गावंड हत्येप्रकरणी साळवीला पोलीस कोठडी

By admin | Updated: November 18, 2014 02:59 IST

पोलीस शिपाई अजय गावंड यांची हत्या करणाऱ्या संतोष साळवी (३१) या तरुणाला न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : पोलीस शिपाई अजय गावंड यांची हत्या करणाऱ्या संतोष साळवी (३१) या तरुणाला न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत साळवी चोरीसाठी इमारतीत शिरलो नव्हतो, असे सांगतो आहे. तूर्तास पोलीस त्याची पार्श्वभूमी काढत आहेत. तसेच त्याच्याकडे कसून चौकशीही सुरू आहे.वाडीबंदरच्या दुमजली इमारतीच्या गच्चीवर साळवी संशयास्पदरीत्या पोहोचला होता. ही माहिती मिळताच सहकाऱ्यांसह गावंड तेथे पोहोचले. ते दुसऱ्या मजल्यावरील खोलीच्या खिडकीतून पाइपलाइनच्या साहाय्याने गच्चीवर चढण्याच्या प्रयत्नात होते. हे पाहून साळवी त्यांच्यावर चालून गेला. त्याही अवस्थेत गावंड साळवीची समजूत काढत होते. त्याच्याशी शांतपणे, गोड बोलून विश्वास निर्माण करू पाहात होते. स्वत:ला पोलिसांच्या हवाली कर, तुला काही होणार नाही, तू काही गुन्हा केलेला नाहीस मग कशाला घाबरतोस, अशी समज देत होते. गावंड पाइपला लटकून गच्चीवर पोहोचणार इतक्यात साळवीने त्यांच्या डोक्यात लाकडी बांबू घातला. यात त्यांचा मृत्यू झाला. साळवीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाने त्याला २४पर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. मात्र मूळचा पुण्याचा साळवी याच इमारतीत का शिरला, गच्चीवर त्याने स्वत:ला कोंडून का घेतले, यासाठी पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत. चौकशीत तो मी चोरी करण्यासाठी इमारतीत शिरलो नव्हतो, असे पोलिसांना सांगतो आहे. त्याच्याविरोधात मुुंबईत एकही गुन्हा नाही. पुण्यातील पार्श्वभूमी पोलीस पडताळून पाहत आहेत. (प्रतिनिधी)