...तर शरद पवार राज्यसभेवर जातील; रोहित पवारांचे मोठे संकेत, अजित पवारांवर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:09 IST2026-02-23T12:08:57+5:302026-02-23T12:09:45+5:30

Sharad Pawar Rajya sabha: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या घातपाताच्या चौकशीची मागणी केली. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरही त्यांनी मोठे विधान केले. वाचा सविस्तर.

Rohit Pawar on Ajit Pawar Budget Session: ...then Sharad Pawar will go to Rajya Sabha; Rohit Pawar's big hint, said about Ajit Pawar... | ...तर शरद पवार राज्यसभेवर जातील; रोहित पवारांचे मोठे संकेत, अजित पवारांवर म्हणाले...

...तर शरद पवार राज्यसभेवर जातील; रोहित पवारांचे मोठे संकेत, अजित पवारांवर म्हणाले...

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ दरम्यान कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाताच्या (घातपाताच्या) चौकशीवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले असून, अद्याप ७० टक्के माहिती समोर येणे बाकी असल्याचे सूचक विधान केले आहे.

अजित पवार यांच्यासोबत घडलेल्या घटनेवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, "बारामतीकरांचे अजितदादांवर प्रेम होते आणि आहे. त्यांच्या बाबतीत झालेल्या घातपाताची चौकशी व्हावी, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे." त्यांनी या प्रकरणावर अमोल मिटकरींनी केलेल्या प्रेझेंटेशनचा संदर्भ देत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

  • CID तपासाचे स्टेटस काय?
  • गुन्ह्याची (Criminal Angle) सद्यस्थिती काय आहे?
  • ट्रॅफिकचे कारण आणि 'एरो हँडलर' यांची चौकशी झाली का?
  • १०-१० वर्षे जर सीबीआय (CBI) कडून तपास होत नसेल, तर या तपासासाठी वेळमर्यादा का ठेवली जात नाही?
     

याचबरोबर रोहित पवारांनी इशारा दिला की, "आम्ही आतापर्यंत केवळ ३० टक्के माहिती दिली आहे, ७० टक्के माहिती अद्याप बाकी आहे. ही माहिती समोर आली तर सरकारला ते महागात पडेल."

लोकांचे प्रश्न आणि महाविकास आघाडी
अधिवेशनात लोकांचे प्रश्न मांडताना आम्ही वैयक्तिक पातळीवर न जाता 'महाविकास आघाडी' म्हणून एकत्रितपणे ताकदीने मांडत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार राज्यसभेवर जाणार?
राज्यसभा निवडणुकीच्या चर्चेवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, "शरद पवार साहेबांना ६० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. जेव्हा अनुभवाची चर्चा होईल तसेच जर त्यांची इच्छा असेल, तर ते नक्कीच राज्यसभेवर जातील. चर्चेच्या वेळी आम्ही साहेबांच्या नावाचा प्रस्ताव नक्कीच ठेवू."

Web Title : शरद पवार राज्यसभा जाएंगे? रोहित पवार का संकेत, अजित पवार पर टिप्पणी।

Web Summary : रोहित पवार ने अजित पवार की दुर्घटना जांच पर सवाल उठाया और छिपी जानकारी का संकेत दिया। उन्होंने सुझाव दिया कि शरद पवार अपनी इच्छा और अनुभव के आधार पर राज्यसभा जा सकते हैं। महा विकास अघाड़ी एकजुट है।

Web Title : Sharad Pawar to Rajya Sabha? Rohit Pawar hints, comments on Ajit Pawar.

Web Summary : Rohit Pawar questioned Ajit Pawar's accident investigation, hinting at hidden information. He suggested Sharad Pawar could go to Rajya Sabha if he wishes, given his experience. The Maha Vikas Aghadi is united.