शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणचे संदीप सावंत शिवसेनेच्या वाटेवर

By admin | Updated: August 17, 2016 21:59 IST

इंदिरा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व राणे समर्थक, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांचा शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला

ऑनलाइन लोकमत

चिपळूण, दि. 17 - इंदिरा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व राणे समर्थक, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांचा शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. शनिवार, २० रोजी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असणारे व राणे कुटुंबीयांसाठी छातीचा कोट करणारे संदीप सावंत हे रत्नागिरी येथील मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहिले नव्हते. याचा राग मनात धरुन माजी खासदार नीलेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप संदीप सावंत यांनी केला. त्यामुळे नीलेश राणे यांना अटक करण्यात आली.दरम्यानच्या काळात सावंत यांनी काँग्रेस तालुकाध्यक्षपद व पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सावंत हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशी सातत्याने चर्चा होती. रक्षाबंधनाच्या दिवशी ते शिवबंधानात अडकणार, असे वृत्त होते. सावंत यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय पक्का असून, शनिवारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.महामार्गावर होणारे लहान - मोठे अपघात असोत किंवा रुग्णाला लागणारे रक्त असो ते तत्काळ उपलब्ध करुन सावंत हे रुग्णांचे प्राण वाचवतात. सामाजिक कार्यात सावंत यांचे योगदान आहे. राणे यांच्याबरोबर काडीमोड घेतल्यानंतर सावंत शनिवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत काही प्रमुख सहकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.