लाच स्वीकारणारा निवृत्त कर्नल रमेश तनेजा गजाआड

By Admin | Updated: June 2, 2014 23:02 IST2014-06-02T22:03:36+5:302014-06-02T23:02:15+5:30

विशेष प्रकल्प अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल रमेश तनेजा यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) रंगेहाथ अटक केली.

Retired Colonel Ramesh Taneja Gajaad, who receives the bribe | लाच स्वीकारणारा निवृत्त कर्नल रमेश तनेजा गजाआड

लाच स्वीकारणारा निवृत्त कर्नल रमेश तनेजा गजाआड

लाच स्वीकारणारा निवृत्त कर्नल रमेश तनेजा गजाआड
शासनाच्या ग्राम स्वयंरोजगार योजनेत तनेजा प्रकल्पअधिकारी
मुंबई। दि. 0२(प्रतिनिधी)
शासन अनुदानित सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेतील विशेष प्रकल्प अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल रमेश तनेजा यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) रंगेहाथ अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयामार्फत राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान हा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना हा विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील १८ ते ३५ वयोगटातील तरूणांना सुरक्षा रक्षक, नर्सिंग, हाऊसकिपिंग, प्लंबिंग या सेवांचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी केंद्र शासनाकडून ७५ तर राज्य शासनाकडून २५ टक्के खर्च केला जातो. महाराष्ट्रात या योजनेमार्फत तरूणांना प्रशिक्षण देण्याचे काम शासनानरे टॉप्सग्रुप इंटरनॅशनल सिक्युरीटी ॲकॅडमी प्रा. लि. कंपनीला दिले आहे. या कंपनीला शासनाकडून प्रत्येक तरूणाच्या प्रशिक्षणासाठी सुमारे १४ ते १६ हजार रूपयांचा खर्च दिला जातो. या कंपनीने हे काम करिअर डिझायनर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले आहे. करिअर डिझायनर कंपनीने आतापर्यंत २०६ बेरोजगार तरूणांना नाशिक जिल्हयातील सटाणा येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले आहे.
दरम्यान, या कामासाठी करिअर डिझायनर कंपनीचे चार लाख रूपये खर्च झाले. हे बील कंपनीने टॉप्स ग्रुपकडे धाडून पैशांची मागणी केली. मात्र बील पास करण्यासाठी टॉप्स ग्रुप कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुरेश तनेजा यांनी १ लाख ५६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र करिअर डिझायनर कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. प्राथमिक चौकशीत तनेजा यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झालयाने त्यांच्याविरेाधात एसीबीने गुन्हा नोंदविला. तसेच आरे कॉलनीत त्यांच्यासाठी सापळा रचला. त्यात तनेजा ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले.

Web Title: Retired Colonel Ramesh Taneja Gajaad, who receives the bribe