शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातग्रस्तांच्या नुकसान भरपाईतील बदलाला विरोध

By admin | Updated: February 13, 2015 01:48 IST

रेल्वे प्रवासा दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत रेल्वेच्या नविन कायद्यात बदल केला जाणार आहे.

मुंबई : रेल्वे प्रवासा दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत रेल्वेच्या नविन कायद्यात बदल केला जाणार आहे. यात नुकसानभरपाईचा भार रेल्वेवर कमी पडावा यासाठी कायद्यात करण्यात येत असलेल्या तरतुदीत अपघातग्रस्त प्रवाशाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई न मिळण्यासाठीच प्रयत्न करण्यात येत असून त्याला लोकल प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. संसद स्थायी समिती (रेल्वे) अध्यक्ष दिनेश त्रिवेदी, समितीचे सदस्य तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेचे अधिकारी तसेच प्रवासी संघटना यांची नरीमन पॉर्इंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये रेल्वेच्या अ‍ॅमेंडमेन्ट अ‍ॅक्ट (बिल) २0१४ मधील नविन तरतुदींवर एक बैठक झाली. या बैठकीत प्रथम सर्व प्रवासी संघटनांचे मत घेण्यात आले आणि त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना किमान चार लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. रेल्वे न्यायालयात गेल्यानंतर सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांचे सोपस्कार पार पाडल्यानतर ही नुकसान भरपाई मिळते. १९९१ सालापासून अशाप्रकारच्या नुकसानभरपाईची तरतुद करण्यात आली असून आता या तरतुदीत नविन रेल्वे कायद्यात बदल करण्याचे सूचविण्यात आले आहे. हा तर प्रवाशांवर अन्याय होण्यासारखे आहे. रेल्वे आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे आमचा याला जोरदार विरोध आहे, असे रेल्वे अ‍ॅक्सिडेंट व्हिक्टिम असोसिएशन अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले. चुकीची तरतुद करण्यात येत असून त्याला आमचा विरोध आहे, असे मुंबई रेल यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले.