शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांचा संप मागे

By admin | Updated: June 20, 2014 00:54 IST

डॉक्टराला मारहाणप्रकरणी १६ जूनपासून पुकारण्यात आलेला संप आज गुरुवारी मागे घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण व संचालनालय (डीएमईआर) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेले आश्वासन,

डीएमईआर आणि मंत्र्यांनी दिले आश्वासन : मेडिकलमध्ये परतले डॉक्टर नागपूर : डॉक्टराला मारहाणप्रकरणी १६ जूनपासून पुकारण्यात आलेला संप आज गुरुवारी मागे घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण व संचालनालय (डीएमईआर) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेले आश्वासन, रुग्णांचे होत असलेले हाल आणि मेडिकल प्रशासनाने वसतिगृहे रिकामे करण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटीसामुळे हा संप मागे घेण्यात आला. मेडिकलचे निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे गरीब रु ग्ण रडवेला आला होता. सलग तीन दिवस मेडिकलमध्ये रुग्णाचे हाल सुरू होते. जिथे सहा डॉक्टर विभाग सांभाळत होते तिथे एक किंवा दोन वरिष्ठ डॉक्टरांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांसोबतच सामान्य रुग्णांनाही याचा मोठा फटका बसला. निवासी डॉक्टर हा मेडिकलचा कणा आहे. हा कणाच नसल्याने या रुग्णालयातील ७० टक्के रुग्णसेवा प्रभावित झाली होती. मागील दोन दिवसांपासून नागपूर मार्डचे पदाधिकारी अधिष्ठाता डॉ. राजारामा पोवार यांच्याशी चर्चा करीत होते, परंतु त्यांच्या मागण्या अधिष्ठाता स्तरावरील नसल्याने त्यांनी गुरुवारी सकाळी मुंबईत डीएमईआर डॉ. प्रवीण शिनगारे व वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी भेट घेतली. यातील काही मागण्या मान्य करण्यात आल्याने सायंकाळी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी सायंकाळी ६ वाजतापासून आपली ‘ड्युटी पोजिशन’ लक्षात घेत कामाची जबाबदारी स्वीकारली. आज दिवसभरात मेडिकलमध्ये नेहमीच्या तुलनेत ओपीडी कमी झाली होती. तातडीच्या शस्त्रक्रिया सोडल्यास इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)