शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या पत्रव्यवहारानंतरही न्या. मार्लापल्लेंना डावलले

By admin | Updated: September 29, 2015 02:54 IST

उच्चशिक्षण विभागाच्या इच्छेनुसार माजी न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले यांची सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांसाठी विशेष विधिज्ञ म्हणून नियुक्ती करावी,

पुणे : उच्चशिक्षण विभागाच्या इच्छेनुसार माजी न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले यांची सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांसाठी विशेष विधिज्ञ म्हणून नियुक्ती करावी, असे लेखी पत्र विधी विभागाच्या सहसचिवांनी दिल्लीतील सरकारी वकिलांना पाठविल्यानंतरही मार्लापल्ले यांना या खटल्यांची कागदपत्रे दिली गेली नाहीत. यासंदर्भातील शासनाचा पत्रव्यवहारच ‘लोकमत’च्या हाती आला आहे. त्यामुळे नेट-सेटचा खटला शासनच गहाळ करू पाहत आहे, असा संशय बळावला आहे. बिगर नेट-सेट धारक प्राध्यापकांना नोकरीत कायम करण्याच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात लढाई देत आहे. सरकारने बाजू मांडण्यासाठी विशेष विधिज्ञ म्हणून बी. एच. मार्लापल्ले यांची नियुक्ती केली आहे. मात्र, दिल्लीतील सरकारी वकील निशांत कटणेश्वरकर यांनी मार्लापल्ले यांच्याकडून खटल्याचे कामकाज परस्पर काढले असून दुसऱ्या वकिलाकडे ते सोपविले. राज्य सरकारने २४ एप्रिलला वकिलांचे पॅनल जाहीर केले. त्यात मार्लापल्ले यांचे नाव नसल्याने त्यांना उच्च शिक्षण विभागाच्या खटल्यांतून वगळले, असा युक्तिवाद कटनेश्वरकर यांनी केला आहे. मात्र, २४ एप्रिलच्या या परिपत्रकानंतर खुद्द विधी व न्याय विभागाचे सहसचिव बी. झेड. सय्यद यांनी ८ जुलैला कटणेश्वरकर यांना पत्र पाठवून उच्च शिक्षण विभागाच्या इच्छेनुसार ‘महाराष्ट्र शासन विरुद्ध सुदामराव आहेर व इतर’ या खटल्याची कागदपत्रे मार्लापल्ले यांच्याकडे सोपवा, असा आदेश त्यांना दिलेला आहे. पत्रानंतर उच्च शिक्षण विभागाने १३ जुलै व २७ जुलैला दोन स्मरणपत्रे सरकारी वकिलांना पाठविली. मात्र, याला सरकारी वकिलांनी प्रतिसाद दिला नाही.