शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्यांकडून १00 कोटींची वसुली

By admin | Updated: April 8, 2015 01:52 IST

विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेला नुकसानीला सामोरे जावे लागत असून, त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे

मुंबई : विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेला नुकसानीला सामोरे जावे लागत असून, त्याविरोधात रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. या कारवाईत प्रवाशांवर दंड आकारण्यात येत असल्यामुळे रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळत आहे. मध्य रेल्वेने २0१४-१५मध्ये विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईत १०० कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले.टीसी आणि रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने मध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. ही कारवाई केल्यामुळे मध्य रेल्वेने चांगलाच दंडही वसूल केला आहे. २0१४-१५मध्ये केलेल्या कारवाईत २१ लाख ३१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून, २0१३-१४मध्ये हीच संख्या १९ लाख ३७ हजार एवढी होती. २0१४-१५मध्ये केलेल्या कारवाईतून तब्बल १00 कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात केलेल्या कारवाईतून ८७ कोटी २५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. जवळपास १५.७0 टक्के दंड वसुलीत वाढ झाली आहे. मध्य रेल्वेकडून करण्यात आलेली कारवाई सर्वांत मोठी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ या विभागांमध्ये मिळून कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. या विभागांतर्गत मध्य प्रदेश, कर्नाटक, इगतपुरी, बल्लारशहा अशी काही महाराष्ट्राबाहेरील ठिकाणेही येतात.