शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा परवान्यांचे फेरवाटप

By admin | Updated: December 30, 2015 01:23 IST

नूतनीकरण न केल्याने अथवा अन्य कारणांनी रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. अशा ४१ हजार ८८४ रिक्षा परवान्यांचे फेरवाटप

मुंबई : नूतनीकरण न केल्याने अथवा अन्य कारणांनी रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. अशा ४१ हजार ८८४ रिक्षा परवान्यांचे फेरवाटप केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. मुंबईतील परवाना फेरवाटप १२ जानेवारी रोजी अंधेरी (पश्चिम) येथील आरटीओत मुंबईतील फेरवाटप होईल.या परवान्यांसाठी इच्छुक व पात्र अर्जदारांना ३१ डिसेंबर २०१५ ते ७ जानेवारी २०१६ या कालावधीत महाआॅनलाइन यांच्या  या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी १ वाजल्यापासून अर्ज करता येणार आहेत. केवळ आॅनलाइन पद्धतीने शुल्कासह अर्ज भरावे लागतील. या लॉटरी ड्रॉसाठी विहित करण्यात आलेल्या अटी व शर्ती तसेच इतर तपशील महाआॅनलाइन या संकेतस्थळावर ३१ डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत.राज्यातील १ लाख ४० हजार ६५ रिक्षा परवाने विविध कारणांस्तव रद्द करण्यात आले होते. या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाने आधी घेतला होता. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर नूतनीकरणासाठी तब्बल चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. १५ डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ देऊनही अवघ्या २९ हजार ४५० परवान्यांचेच नूतनीकरण झाले. उर्वरित परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार आता शिल्लक १ लाख १० हजारांपैकी ४१ हजार ८८४ परवान्यांचेच लॉटरीद्वारे फेरवाटप होणार आहे. (प्रतिनिधी)