कारखेडा : वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी हभप श्रीराम महाराज कारखेडकर उर्फ श्रीराम प्रभू जाधव यांनी थेट अरुणावती नदीच्या पात्रात पाऊस येण्यासाठी भगवत गीतेचे वाचन करून देवाची आराधाना २६ जूनपासून चालविली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}जून महिना संपत आला तरी पावसाचे आगमन झालेले नाही. शेतकर्यांनी शेतमशागती पूर्ण करून हजारो रूपयाचे खत बियाणे आणूनठेवले आहे. काही शेतकर्याने बिज जमिनीत टाकले तर काही प्रतिक्षेत आहे. पावसाचे आगमन लांबल्याने मजुराच्या हाताला काम मिळेणासे झाले.यामुळे हभप श्रीराम महाराज कारखेडकर यानी नदीपात्रात भगवत गितेचे वाचन सुरु केले आहे.या आधी सुद्धा त्यांनी दोन वेळा नदीच्या पात्रात भगवतगीतेचे वाचन केले होते.