मुख्यमंत्रीपदाची राव यांना शपथ

By Admin | Updated: June 2, 2014 23:25 IST2014-06-02T23:25:26+5:302014-06-02T23:25:26+5:30

वेगळ्या तेलंगण राज्यासाठी दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची आज सोमवारी इतिश्री झाली आणि भारताचे 29 वे राज्य म्हणून तेलंगणचा जन्म झाला़

RAW to the oath of office of chief minister | मुख्यमंत्रीपदाची राव यांना शपथ

मुख्यमंत्रीपदाची राव यांना शपथ

>तेलंगण अस्तित्वात : दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची इतिश्री
हैदराबाद : वेगळ्या तेलंगण राज्यासाठी दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची आज सोमवारी इतिश्री झाली आणि भारताचे 29 वे राज्य म्हणून तेलंगणचा जन्म झाला़ तेलंगण राष्ट्र समितीचे(टीआरएस) प्रमुख क़े चंद्रशेखर राव यांनी तेलंगणचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली़
 राज्यपाल ई़एस़एल़ नरसिम्हन यांनी 6क् वर्षीय क़े चंद्रशेखर राव यांना राजभवनात आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली़ राव यांचे चिरंजीव क़ेटी़ रामा राव, पुतण्या टी़ हरीश राव आणि अन्य नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली़ राव यांच्या मंत्रिमंडळातील अन्य नऊ मंत्र्यांमध्ये मोहम्मद महमूद अली, टी राजैय्या, नयनी नरसिंह रेड्डी, इतेला राजेंद्र, पी़ श्रीनिवास रेड्डी, टी पद्मा राव, पी़ महेन्द्र रेड्डी, जोगू रमन्ना आणि जी़ जगदीश रेड्डी यांचा समावेश आह़े
राव यांनी वेगळ्या तेलंगण राज्याच्या मागणीसाठी सन 2क्क्1 मध्ये तेलगू देसम पार्टी सोडून तेलंगण राष्ट्र समिती स्थापन केली होती़ अनेक वर्षाच्या संघर्षानंतर तत्कालीन काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण निर्मितीला हिरवा कंदील दाखवला होता़ 
फेब्रुवारी महिन्यात लोकसभेने तेलंगण विधेयक मंजूर केले होत़े यानंतर आंध्रप्रदेशचे औपचारिक विभाजन होऊन नव्या तेलंगण राज्यनिर्मितीसाठी 2 जूनचा मुहूर्त ठरला होता. (वृत्तसंस्था)
 
चंद्राबाबूंची पाठ
-तेलंगण राज्य अस्तित्वात आले पण नव्या राज्यातील पहिल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला नाराजीची किनार दिसली़ दुस:या राज्याचे भावी मुख्यमंत्री एऩ चंद्राबाबू नायडू हे राव यांच्या शपथविधीस गैरहजर राहिल़े तेलंगण व आंध्रातील ‘प्रादेशिक नाराजी’चा हा प्रारंभ मानला जात आह़े 
 
-सन 2क्क्क् मध्ये केंद्रात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे(रालोआ) सरकार असताना बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून अनुक्रमे झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड ही तीन नवी राज्ये अस्तित्वात आली होती़ त्यानंतर प्रथमच तेलंगण हे नवे राज्य गठित झाल़े

Web Title: RAW to the oath of office of chief minister