जवखेडे प्रकरणी रवींद्र जाधवची चौकशी होणार

By Admin | Updated: December 15, 2014 03:43 IST2014-12-15T03:43:24+5:302014-12-15T03:43:24+5:30

जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी मृत संजय जाधव यांचा मोठा भाऊ रवींद्र जाधव याची आता चौकशी होणार आहे.

Ravindra Jadhav will be questioned in Jawkhede case | जवखेडे प्रकरणी रवींद्र जाधवची चौकशी होणार

जवखेडे प्रकरणी रवींद्र जाधवची चौकशी होणार

अहमदनगर : जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी मृत संजय जाधव यांचा मोठा भाऊ रवींद्र जाधव याची आता चौकशी होणार आहे. त्याला मुंबईत अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.
चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस रवींद्रला बजावण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी अटक केलेले प्रशांत दिलीप जाधव आणि अशोक दिलीप जाधव सध्या पोलीस कोठडीत आहेत. प्रशांत पोलिसांना उलट-सुलट माहिती देत आहे. मृत संजय यांचा रवींद्र जाधव हा मोठा भाऊ असून प्रशांत व अशोक यांचा काका आहे. रवींद्रचा हत्याकांडात सहभाग आहे काय?, याची पोलिसांना चौकशी करायची आहे. मात्र तो पोलिसांसमोर अजून हजर झालेला नाही. रवींद्र याच्या एका सल्लागाराची मुंबईत चौकशी झाली, त्यावेळी तो फरार झाला होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा दाट संशय आहे.
नव्याने कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांना हव्या असलेल्या संशयितांची चौकशी करणे हा तपासाचा भाग आहे. रवींद्र जाधव याला अद्याप ताब्यातही घेतले नाही किंवा अटकही केलेली नाही, असे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Ravindra Jadhav will be questioned in Jawkhede case